देवाला आली ओंकारची आठवण; युवा कलाकारचे अपघाती निधन

देवाला आली ओंकारची आठवण; युवा कलाकारचे अपघाती निधन

सोलापूर : सोशल मीडीयावर प्रसिद्ध असलेल्या ओंकार भीमाशंकर पद्मगोंडा (वय 22, रा. भवानी पेठ, सोलापूर) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ओंकार हा बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचा सदस्य होता. त्याच्या निधनानंतर मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ओंकारचे फोटो, व्हिडीओ शेअर करुन श्रध्दांजली वाहिली आहे. ओंकारला मॉडेलिंगची आवड होती. युवा कलाकार म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती.

रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री मार्केट यार्ड जवळ दुचाकीवरून पडल्याने ओंकार हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचार करून ओंकारला घरी नेण्यात आले. घरी गेल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे उपचाराला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद पोलीसात झाली आहे. ओंकारच्या मागे वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ लिपिक  भीमाशंकर पद्मगोंडा यांचा तो मुलगा होता. विविध व्हिडीओ करुन ओंकार इंस्टाग्राम, फेसबुकवर शेअर करायचा. तो लोकप्रिय होता. त्याला इंस्टाग्रामवर 21 हजार 700 फॉलोवर्स होते. हिराचंद नेमचंद कॉलेजमध्ये ओंकारने बीकॉम केले होते. ओंकार हा बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचा सदस्य होता. इंस्टाग्रामवर त्याच्या रिल्सला मोठा प्रतिसाद मिळायचा. त्याच्या अंत्यविधीला मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

जास्तीपण देवाची आठवण काढत जावू नका मित्रांनो.. नाहीतर देवाला तुमची आठवण येईल.. असे सांगणारा एक व्हिडीओ ओंकार याने आपल्या इंस्टाग्रामवर 2 सप्टेंबर रोजी शेअर केला होता.
पहा व्हिडीओ-