पोदार इंटरनॅशनल स्कूलचे दहावी परीक्षेत यश! वाचा निकाल..

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे दहावी परीक्षेत यश! वाचा निकाल..

सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज मंगळवारी दुपारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. पोदार इंटरनॅशनल स्कूल ने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

या निकालानुसार कु. आर्यन दिनेश आहिरे 96.60% गुण मिळवून प्रथम, कु. अनघा नरेश पवार व कु. ज्ञानेश्वरी तानाजीराव पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी 95 .20% गुण मिळवून द्वितीय, तर कु. अस्मित अजयकुमार पांडा यांनी 95% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे 11 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले तर 7 विद्यार्थीनी 80 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

तसेच इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य समरेन्द्र पाणिग्रही व विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार पाटील, प्रशालेच्या वरिष्ठ समन्वयक आसमा तडमोड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.