सोलापुरात शिक्षण घेतलं; सीपी म्हणून काम करायला मिळाल्याचा आनंद!

सोलापुरात शिक्षण घेतलं; सीपी म्हणून काम करायला मिळाल्याचा आनंद!

Police Commissioner Sudhir Hiremath Solapur News

सोलापूर : क्राइम कंट्रोल आणि लॉऑर्डर सर्वात महत्त्वाचे असून सोलापुरात अजून चांगलं काय करता येईल या संदर्भात मी सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, असे नवे पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. हरीश बैजल पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, गुन्हेगारी नियंत्रणासाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल व आपल्या पोलीसिंगमध्ये जी उपलब्ध टेक्नॉलॉजी आहे, त्याचा जास्तीत जास्त पुरेपूर उपयोग होतो का नाही तो देखील पाहणार आहे. यासंदर्भात मी डीसीपी क्राईम यांच्याशी चर्चा केली आहे. 

माझी नेमणूक ही डीआयजी, सीआयडी पुणे येथे आहे मात्र आता वरिष्ठांच्या आदेशानुसार सोलापूर शहरात जोपर्यंत नवीन नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा पदभार माझ्याकडे दिला आहे. माझे शालेय शिक्षण हे सोलापूर व पंढरपूर येथे झाले असून अकरावी आणि बारावी दयानंद कॉलेज येथे केली आहे. तसेच आठ वर्ष दिल्ली येथे माझं शिक्षण घेतले आहे. सोलापूर पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळला मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड येथे डीजी ऑफिस, एस.आर.पी.एफ याठिकाणी काम केले आहे. वाशिम, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात देखील काम केले आहे. त्यानंतर गेल्या वर्षी पदोन्नतीवर सीआयडी येथे डीआयजी म्हणून काम पाहत आहे. तसेच डीसीपी ट्राफिक म्हणून मी काम पाहिले असून सोलापूरच्या वाहतुकीसंदर्भात देखील चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न करेन. मला माहित नाही हा चार्ज माझ्याकडे कधीपर्यंत आहे, परंतु जोपर्यंत वरिष्ठांकडून जसे आदेश येथील तोपर्यंत इथे मी काम करणार आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले.

सोलापूरच्या वाहतूक समस्याकडे लक्ष देऊ

यापूर्वी मी डीसीपी ट्राफिक म्हणून पण कामकाज पाहिले आहे. सोलापूरच्या वाहतुकीसंदर्भात आढावा घेऊन शहरातील अवैध वाहतूक किंवा पार्किंगच्या समस्या असतील व वाहतुकीला शिस्त कशी लागेल या सगळ्या गोष्टीत लक्ष देणार आहे. जनतेने ट्राफिक नियमांचे पालन करून वाहन चालवावे. ही अपेक्षा आहे, चलान करणे, चलान वसूल करणे हा नंतरचा भाग आहे. यामध्ये ट्राफिक रेगुलेशन सर्वात महत्त्वाचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संवाद साधला असून, चांगलं काय करता येईल यासाठी मी प्रयत्न करेल, असेही पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.