सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात हरीश बैजल झाले भावूक!

Police Officer Harish Baijal Retirement Ceremony Solapur

सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात हरीश बैजल झाले भावूक!

Police Officer Harish Baijal Retirement Ceremony Solapur

सोलापूर : हरीश बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, संजय साळंके, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचा काल सेवानिवृत्ती समारंभ पार पडला.

Video :

या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, सर्व पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच कु. लक्ष्मी शिंदे, खास सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी सायकलवरुन नाशिक येथून आलेले सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मित्र परिवार, शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) सोलापूर शहर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ, सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस आयुक्त साहेबांसोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल याबाबत आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना भावी निरोगी आयुष्याबद्धल शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलीस आयुक्तांचे चिरंजीव श्री. अभिषेक बैजल, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांचे चिरंजीव धनंजय साळुंखे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, कार्यक्रमाप्रसंगी निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले श्री. माकेश आईप, डॉ. सौ. मनिषा रौंदळ श्री अनिल सोनवणे आणि धनंजय साळुंखे आदी इतर मान्यवर यांनी देखील पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल यांच्या कार्याबद्धल त्यांना आलेले अनुभव त्यांच्या भाषणातून व्यक्त केले.

पोलीस अयुक्त आणि पोलीस अधिकारी यांचा आयुक्तालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देत असतांना पोलीस आयुक्त मा. श्री. हरीश बैजल, श्री. अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि श्री. संजय साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार, सन्मानिय मान्यवर, पत्रकार, मिडीया व इतर यांचे आपल्या भाषणातून आभार व्यक्त केल्ले.

दरम्यान, श्री. हरीश बैजल, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी झालेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आपल्या पोलीस सेवेतील अनुभव आणि प्रसंगाबद्दल म्हणाले की, मी सन ११९३ साली महाराष्ट्र पोलीस सेवेत पोलीस अधिकारी म्हणुन रुजू झालो. पोलीस दलातील सेवेबरोबरच सामाजिक अडी-अडचणी देखील सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही देखील भविष्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच सामाजिकतेचे भान ठेवावे आणि आपली कर्तव्य आणि जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा संदेश उपस्थितांना दिला. मनोगत व्यक्त करताना हरीश बैजल भावूक झाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस अंमलदार मलकप्पा बणजगोळे यानी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कल्याण विभागाचे पोनि शिवशंकर बोंदर, पोलीस अंमलदार संजय हुंडेकरी, बाबु मंगरुळे, संतोष चाबुकस्वार आणि अमोल कानडे यांनी परिश्रम घेतले.