पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police constable dies of heart attack

सोलापूर  : सोलापूर शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार संजय बाबूराव सावरे (वय 46, मूळ रा. निलंगा लातूर - हल्ली समर्थ सोसायटी, सोरेगाव एसआरपी कॅम्पजवळ, सोलापूर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सावरे यांच्याकडे नवप्रविष्ट पोलिसांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. एक चांगला पोलीस अंमलदार गेल्याचे दुःख व्यक्त होत आहे.

बुधवारी पोलिस आयुक्तालयात साफसफाई करणार्‍यांचे निरीक्षण करण्यासाठी हवालदार संजय सावरे आले होते. आयुक्तालयात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. हवालदार सावरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे.

हवालदार सावरे यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री साडेनऊला मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस मुख्यालयात हवालदार संजय सावरे हे मास्तर म्हणून परिचित होते. नवप्रविष्ट पोलिसांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.