विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार; प्रयास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार; प्रयास संस्थेच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाकडून योग्यत्या सूचना थेट विद्यार्थीच्या मोबाईल नंबरवर एसएमएसव्दारे कळविण्यात येणार आहेत. प्रयास संस्थेच्या मागणीची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालय, सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
मात्र, परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थी, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर झाले असून याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षेबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाकङून योग्य त्या सूचना थेट मोबाईल क्रमांकावर 'एसएमएस' च्या माध्यमातून मिळावे. यासाठी प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनास समक्ष भेटून या विषयाकडे लक्ष वेधून घेतले. याबाबत तात्काळ विद्यापीठ प्रशासनाकडून मागणीची दखल घेण्यात आली. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

तसेच विद्यापीठातर्फे शैक्षणिक माहिती, परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतात.पंरतु ग्रामीण भागातील विद्यार्थी नियमितपणे संकेतस्थळ पाहू शकत नाहीत.त्यामुळे अनेकदा त्यांना उशीरा माहिती मिळते.शिवाय निकाल आल्यानंतर फेरमूल्यांकनाच्या अर्जासाठी फारच कमी दिवसांचीच मुदत असते. निकालाची माहितीच उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थीना वेळेत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. महाविद्यालयाकङून देखील त्यांना मुदतीत माहिती दिली जात नाही.दुसरीकडे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षेचा अर्ज भरावा लागतो.तो अर्ज भरायला उशीर झाला तर विलंब शुल्क द्यावे लागते व त्यामुळे विद्यार्थीना अर्थिक भुर्दंड बसतो यासाठी तात्काळ विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रयास संस्थेचे सचिन शिंदे यांनी कळविले आहे.