पब-जीला टक्कर देण्यासाठी येणार फौ-जी!

पब-जीला टक्कर देण्यासाठी येणार फौ-जी!

चित्रपट अभिनेता अक्षयकुमारने केली महत्वाची घोषणा

सोलापूर : पब-जी गेमवर बंदी आणल्यानंतर चित्रपट अभिनेता अक्षयकुमारने एक महत्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेस पाठिंबा देत अक्षयने फौ-जी या नावाने गेम लाँच केले आहे. 

फौ-जी गेमच्या माध्यमातून करमणूकीसोबतच लोकांना भारतीय सैनिकांच्या बलीदानाबद्दलही माहिती मिळणार आहे. या गेमच्या माध्यमातून जमा होणार्‍या उत्पन्नातील 20 टक्के रक्कम थेट भारतके वीर या उपक्रमासाठी देणगी म्हणून दिली जाणार आहे. 

नुकतेच केंद्र शासनाने पब-जीसह अनेक अ‍ॅपवर बंदी आणली आहे. पब-जी गेम बंद झाल्याने गेमप्रेम तरुण सध्या तणावाखाली असल्याचेही दिसून येत आहे. सोशल मीडीयावर याबाबत अनेक विनोदही केले जात आहेत. फौ-जी गेम लवकरच येणार असल्याची पोस्ट अक्षयकुमारने आपल्या सोशल मीडीया हॅण्डलवरून केली आहे.

 

अभिनेता अक्षयकुमार नेहमीच देशहिताच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असतो. त्याच्याच पुढाकारातून आधीपासूनच भारत के वीर हा भारतीय निमलष्करी दलासाठी निधी गोळा करणारा उपक्रम राबविला जात आहे.