मानहानीप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल विरोधात 5 कोटींचा दावा

मानहानीप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल विरोधात 5 कोटींचा दावा

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची सोलापूर न्यायालयात फिर्याद दाखल

सोलापूर : खोटे आरोप करुन मानहानी केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी 5 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा सोलापूर येथील मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग- 1 कोर्ट नं. 1 यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल (वय- 47 वर्षे, रा. रेल्वे लाईन्स, महापौर बंगल्याजवळ, सोलापूर) यांच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 190 अन्वये व इंडियन पिनल कोड कलम 500,501 अन्वये 5 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्त्तम दत्तात्रय बरडे (वय- 61 वर्षे, रा. गुलमोहर अपार्टमेंट,अवंती नगर, जुना पुना नाका,सोलापूर) यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

आरोपी मनोज शेजवाल हे शिवसेना या पक्षाचा नगरसेवक असून मोहोळ विधानसभा मतदार संघातून सन 2019 मध्ये शिवसेना पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई केली आहे. शेजवाल हे कुंटणखाना (वेश्या व्यवसाय) चालवत असल्याबाबत त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.  शेजवाल यांनी 23 फेबुृवारी 2021 रोजी पत्रकार परिषद घेवून बरडे यांच्यावर  अनेक खोटेनाटे आरोप केले आहेत. विविध दैनिकांमध्ये तसेच वृत्तवाहिन्यांवर बरडे यांच्या विरुध्द बदनामीकारक आरोप प्रसिध्द झाले आहेत. वास्तविक पाहता आरोपी शेजवाल यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली आहे. मोहोळ विधानसभेतून सन 2019 मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे.

नगरसेवक शेजवाल यांनी बरडे यांची बदनामी होऊन त्यांची राजकिय कारकिर्द धोक्यात यावी व शिवसेनेचे कार्यकर्त्याचा व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपवावा या हेतुने केवळ मानहानी व बदनामी केली आहे. यातील फिर्यादी बरडे यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी आरोपीस कडक शासन अथवा शिक्षा होणे न्यायाचे दृष्टिने गरजेचे आहे. आरोपी शेजवाल यांनी पत्रकार परिषद ही रेल्वे लाईन येथील गुडलक जनरल स्टोअर्सच्या बाजूच्या आरोपीचे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आहे. हे घटनास्थळ सदर बझार पोलिस स्टेशनच्या हददीत असल्याने न्यायालयास हा खटला चालवून निर्णय देण्याचा अधिकार आहे, असे दाव्यात म्हटले आहे. यात फिर्यादी पुरुषोत्तम बरडे यांच्यातर्फे ॲड. संतोष न्हावकर हे काम पाहत आहेत.