राजेंद्र माने सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

Rajendra Mane Solapur Police Commissioner
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेंद्र माने हे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. हरीश बैजल हे पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे गेल्या आठवड्यात सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला होता.
आज बुधवारी सायंकाळी गृह विभागाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजेंद्र माने यांनी यापूर्वी सोलापुरात पोलीस उपायुक्त पदावर कर्तव्य बजावले आहे. भूषणकुमार उपाध्याय हे पोलीस आयुक्त असताना राजेंद्र माने परिमंडळ विभागाचे पोलिस उपायुक्त होते.