कुष्ठरुग्णांना दिवाळीत मिळाली फळे; रॉबीन हुड आर्मीचा उपक्रम

कुष्ठरुग्णांना दिवाळीत मिळाली फळे; रॉबीन हुड आर्मीचा उपक्रम

दिवाळीचा फराळ; गरजूंना द्या फळे उपक्रमांतर्गत १००७ गरजूंना केले फळे वाटप

राॅबीन हुड आर्मी सोलापूरच्या वतीने सलग सहाव्या वर्षी दिवाळी निमित्त राबविला उपक्रम
सोलापूर : सोलापूरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमाच्या ठिकाणचे शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोचविणार्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने आता पर्यंत चार लाख पेक्षा गरजूंना अन्नदान करण्यात आले आहे. केवळ शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये व कुष्ठरोगी रुग्णांना रोजचे जेवण मिळावे या हेतूने दररोज अन्नदान उपक्रम देखील मागील चार वर्षांपासून राबविला जात आहे. दिवाळी निमित्त येणारा आधिक फराळाचा भार लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी नको दिवाळीचा फराळ द्या फळे गरजूंना हा उपक्रम राबविण्यात आला व पहील्या अंघोळी दिवशी केवळ एक फराळाचे पॅकेट व इतर दिवाशी फक्त फळे असा उपक्रम राबवून सुमारे १००७ गरजूंच्या घरी दिवाळी साजरा केल्याची माहिती आर्मीचे प्रमुख हिंदुराव गोरे यांनी दिली. 
दिवाळी च्या फराळामध्ये चिवडा, लाडू, चकली, शेव,करंजी व शंकरपाळ्या हे पहील्याच दिवशी फक्त एक पॅकेट व इतर सर्व दिवशी सफरचंद, मोसंबी, चिक्कू, केळी, पेरू व गोड पदार्थ असे अन्न पदार्थ सोलापूरातील कुष्ठरोगी रुग्णांना एक वेळच्या जेवणासोबत देण्यात आले.

 या साठी इनर व्हील क्लब आॅफ सोलापूर हारमोनी च्या अर्चना जाजू, गीता राजानी, तृषा गुप्ता, हेमा काबरा, रीतु राठी, अर्पिता लहेजा त्याच बरोबर महेश बिराजदार, सकलेन शेख, सुमित पंडीत, यशराज डोंगरे, मंदार नीळ, रविंद्र संत, राजेंद्र बाहेती, संप्रित कुलकर्णी, बलराज बायस, अमोल पानसरे, राजेश शेळगी, कपिल बायस, रतिकांत राजमाने, स्नेहल चलवादी, रविराज माढेकर, बर्जिन मास्टर, डाॅ. बागेश्री बोक्से, विरेश गुंदगे, डाॅ. नीलम जैन, अमर साखरे, विवेक मोटूर, अविनाश जक्का, विनायक कामुर्ती, श्रीनिवास कासल, राजेश सारंगी, प्रसन्न तंबाके, ओमी फ्रेंड्स ग्रुप, शहाजी, भोसले, पल्लवी सावस्कर, व्यंकटेश कल्याणम्म, गोपाळ नाडीगोटू, आकाश शाबादी, संध्या वैद्य, सुशील देशमुख आदींनी योगदान दिले. 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चन्नशेट्टी, मल्लीनाथ शेट्टी, विघ्नेश माने, समर्थ उबाळे, प्रेम भोगडे, आकाश मुस्तारे, अक्षय कारंजे, गोपाळ नाडीगोटू, पल्लवी सावस्कर, अमित दाभडे, प्रतिक बाडोले, अमोल गुंड, प्रेम कुर्हाडकर, धनाजी नीळ, कुशल ओत्सवाल, रवी चन्ना, नागेश सरगम, अविनाश जक्का, विवेक मोटूर, ऋतुजा अंदेली आदींनी परीश्रम घेतले.