चपाती, भाजीसोबतच गरजूंना मिळाला रसगुल्ला, सोनपापडी!

चपाती, भाजीसोबतच गरजूंना मिळाला रसगुल्ला, सोनपापडी!

रॉबिन हूड आर्मीचा उपक्रम; नवरात्रीच्या नऊ रंगा प्रमाणे द्या पौष्टिक आहार गरजूंना उपक्रमांतर्गत २४२७ गरजूंना केले अन्नदान

सोलापूर : सोलापूरातील हाॅटेल, मंगल कार्यालय येथील शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न आतापर्यंत चार लाख पेक्षा जास्त गरजूं पर्यंत पोहचविणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

नवरात्री त्याच बरोबर सणासुदीला वंचित व गरजूंना रोजच्या जेवणाबरोबर गोड पदार्थ व फळे खायला मिळावेत या हेतूने " नवरात्रीच्या नऊ रंगा प्रमाणे द्या पौष्टिक आहार गरजूंना " उपक्रम राबवून सुमारे २४२७ गरजूं पर्यंत रोजच्या जेवणा बरोबर गोड पदार्थ व फळे दिल्याचे माहिती आर्मीचे प्रमुख हिंदुराव गोरे यांनी दिली. 

रोजचे जेवण चपाती, भाजी याबरोबर साबुदाणा खिचडी, बर्फी, रसगुल्ला, लाडू, पेढा, जिलेबी, काजू कतली, सोनपापडी, म्हैसूर पाक, राजगिरा लाडू, शेंगा लाडू, केळी, सफरचंद, पेरु, सुगंधी दुध, जोश कोल्ड्रिंक्स, काजू, बदाम, खोबऱ्याची वडी, बालुशाही व चिक्की आदी पदार्थ सोलापूरातील कुष्ठरोगी वसाहत येथे नऊ दिवस घरपोच देण्यात आले. 

सोलापूरातील सोलापूर टाॅवेल सिटी राऊंड टेबल १५० यांनी नऊ दिवस जेवण त्याच बरोबर इतर अर्चना जाजू, गीता राजानी, तृषा गुप्ता, हेमा काबरा, गीता देवी सारडा, आरती कोठारी, अर्पिता लहेजा, महेश बिराजदार, प्रतिभा पाटील, पल्लवी सावसकर, स्नेहल चलवादी, बलराज बायस, रतीकांत राजमाने, रविराज माढेकर, शुभांगी भोसले, सचिन बगले, सोमशेखर हिरेमठ, संदिप कुलकर्णी, विरेश गुंदगे, महेश जेऊर, अमित कांबळे, अजित वाडेकर, सचिन रामपूरे, प्रसाद साळुंखे, सुरज रघोजी, आकाश शाबादी, स्मिता अडवीतोटे, मनाली शेट्टी, श्रीदीप हसापुरे, प्रसन्न तंबाके, नारायण जोशी, अक्षय बचुटे, सिद्धराम कंकरे, रोहीत निर्वाणी, रोहीत कसबे, अर्पिता खडकीकर कुलकर्णी, पेठे फुड्स, वैशाली जैन, संदिप जाधव, बिपीन आडकी, विवेक दिवाणजी, डॉ. शंकर नवले, सकलेन शेख, सुमित पंडीत, प्रभास डार्लिंग ग्रुप, ज्योती होमकर, धनाजी नीळ, रेणुका देशपांडे, मुस्तफा इनामदार, माहेश्वरी जिल्हा महीला संघटन, अंजली बलदवा, नंदकिशोर बलदवा यांनी गोड पदार्थ व फळे असे योगदान दिले. 

उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिकेत चनशेट्टी, प्रा. संजीव म्हमाणे, संध्या वैद्य, ऋतुजा अंदेली, प्रियांका वडनाल, समर्थ उबाळे, अमोल गुंड, विघ्नेश माने, अरुण कुर्हाडकर, प्रेम कुर्हाडकर, सुभाष कुरले, प्रेम भोगडे, डोंगरेश चाबूकस्वार, धनाजी नीळ, दिग्विजय पवार, रोहीतकुमार राम, ऋषीकेश फाफळ, संदिप कुलकर्णी, मल्लिनाथ शेट्टी, अतिश बचुटे, रोहन सावंत, आदित्य जगताप, आकाश मुस्के यांनी परिश्रम घेतले.