पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह!

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना पॉझिटिव्ह!

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोना बाधा झाली होती. 

गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना मेसेज पाठवून कोरोना झाल्याची माहिती दिली. तसेच या संदर्भातील ट्विट त्यांनी केला आहे. उपचार घेऊन बरे होईपर्यंत त्यांचा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे असणार आहे.

‘आज मला कोविडचे निदान झाले आहे. गेल्या 3-4 दिवसात जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून योग्य खबरदारी घ्यावी. माझा प्रभार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे असणार आहे. काळजी घ्या.’ असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.