‘संभव’ने लावला वारांगनांच्या दारात समानतेचा दिवा!

‘संभव’ने लावला वारांगनांच्या दारात समानतेचा दिवा!

Sambhav Foundation News

सोलापूर  : एक दिवा समतेचा वारांगनेच्या दारात... हि संकल्पना घेऊन तरटी नाका परिसरातील वारांगना सोबत संभव फाऊंडेशनने दिवाळी साजरी केली.0

आपली दिवाळी दरवर्षीच थाटामाटात साजरी होते यंदाच्या दिवाळीत तृप्तीचा हा परिघ वाढवूया... म्हणत संभव फाऊंडेशनने वारांगना म्हणजेच (समाजाच्या भाषेत  #वेश्या) यांच्या सोबत झाड,भुईचक्कर,फुलबाजा,असे फटाके उठवत महिलांनी दिवाळी साजरी करत एकमेकांना शुभेच्छा देत चिवडा,लाडू,शंकरपाळीचा आस्वाद घेतला फराळा सोबतच उटणे,मोती साबण,पणती,भेट देत दिवाळी साजरा करत हा तृप्तीचा परिघ वाढवला आहे.

आनंदाच्या व्याख्या व्यक्तीसापेक्ष बदलत जातात.  वारांगना यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण कोणते असं जर कुणी विचारलं तर उत्तर देण्यास फारसा वेळ लागणार नाही इतके कमी आनंद त्यांच्या वाट्याला येतात.स्वेच्छेनं धंद्यात येणाऱ्या वेश्यांचे प्रमाण अत्यल्प आहे यांच्या आयुष्यात शोषण, उपेक्षा आणि तिरस्कार यांचं दुःख वाट्याला येतं तर यांच्या सुखाच्या काही क्षणात तिळभर तांदळाच्या कणा प्रमाणे. काही वर्षापासून आम्ही ही सहभागी होतोय याचा आनंद आहे.ज्यांचा घरात कधी दिवाळीचा दिवा लागत नाही.

ज्या महिला कधी भाऊबिजेला भावाला ओवाळला जात नाहीत अश्या महिला एरव्ही वेदना आणि तिरस्कार यांनी ग्रासलेले वारांगनाचे चेहेरे इथं दिवाळी साजरी करताना कमालीचे बोलके आणि प्रसन्न वाटतात. एक दिवा समतेचा वारांगनेच्या दारात... हि संकल्पना घेऊन संभव  फाऊंडेशनने याही वर्षी येथील महिलांसमवेत दिवाळी साजरा केली.यावेळी संभव फाऊंडेशनचे आतिश कविता लक्ष्मण,आकाश बनसोडे,रमाकांत दोड्डी,आस्मिता गायकवाड,राणी राजगुरु,जगदिश पाटिल,राहुल बिराजदार,पवन व्हकवडे,शुभम कांबळे,रोहन कामने,मंदार कुलकर्णी शितल कांबळे,वृषाली गायकवाड,चेतन लिगाडे आदींची उपस्थिती होती.

या महिलांच्या जीवनातही प्रकाशाचा उदय व्हावा यासाठी
मागील पाच वर्षे पासून या उपक्रमचे आयोजन केले जाते. दर वर्षे आम्ही यांच्या सोबत दिवाळी साजरी करतो आनंदाचे काही क्षण यांच्या सोबत साजरी करतो.
भेटीगाठी शुभेच्छा फराळ फटाके देत त्यांच्या दारात समतेचा दिवा लावून मनोभावी त्यांचा आदर करून परतत असतो त्यांच्या असंख्य अडचणीच प्रश्नां ओझं घेता एक ओलावा मायेचा ते देऊन जातात आम्हाला काही क्षणाचा एकदा तरी यांना प्रेम देऊन पाहिलं की यांच्याबद्दलचा दृष्टिकोन नक्की बदलतो. त्यासाठी प्रयत्न तरी करायला हवा.यांच्या साठी एक संघटन आहे महिला क्रांती संघ आणि यांचे चांगले सहकार्य लाभते.
- आतिश कविता लक्ष्मण सिरसट,

अध्यक्ष संभव फाऊंडेशन, सोलापूर