पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या!

पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या!

Santosh Gaikwad barshi suicide news

सोलापूर : बार्शी परिसरातील उपळाई रोड येथे राहणाऱ्या संतोष गायकवाड यांनी मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मेसेज संतोष यांनी आत्महत्येपूर्वी सर्व मित्रांना पाठवल्याचे समोर आले आहे.

संतोष गायकवाड यांच्या आत्महत्येच्या बातमीने मित्र परिवार आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. डीजे वादक, क्रिकेट समालोचक, आंदोलक, शिवभक्त आणि राणे समर्थक अशी संतोष गायकवाड यांची ओळख होती.

संतोष गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त होत आहे. संतोष हे मूळ पाथरी गावचे होते. मात्र ते बार्शीतच स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांची पोस्ट - 
‘भावपुर्ण_श्रध्दांजली_मित्रा
काल रात्री उशिरा वाढदिवस कार्यक्रम उरकून घरी पोहोचलो. मोबाईल पाहत असताना व्हॉटसअपला अचानक संतोषचा मेसेज आला. मेसेज वाचून डोकच सुन्न झाले. बायको, मेहुणी, सासूच्या जाचाला कंटळून मी आत्महत्या करीत आहे.. असा मेसेज होता. मी लगेच संतोषला मेसेज केला असा टोकाचा निर्णय घेऊ नका आपण चर्चेने प्रश्न सोडवू. काहीतरी मार्ग निघेल परंतु तो माझा मेसेज वाचला नाही. online तर होता. मी लगेच माझ्या बार्शीतील मित्रांना फोन लावायला सुरुवात केली. 6 ते 7 जण फोन उचलले नाहीत फक्त 2 जण फोन उचलले. त्यातील एका मित्राने त्याच्या गल्लीतील एका मित्राला त्याच्या घरी पाठवले व त्याचा नंबर मला पाठवला. मी तरीही बार्शी पोलीस स्टेशनचा नंबर शोधत होतो. नंबर मिळाला नाही. मी ग्रामीण कंट्रोल रूमला फोन करून सविस्तर माहिती दिली. त्यांनीही लगेच जवळच्या पोलिसांना त्याच्या घरी पाठवले. त्या मित्राला फोन केला. तो घरी पोहोचला होताच परंतु 1 ते 2 मिनिटे उशीर झाला होता. संतोषने गळफास घेतला होता. रात्री जर अजून कोणी फोन उचलला असता तर संतोष वाचलाही असता. इतका पण उशीर झाला नव्हता. मी 12 वाजता फोन करत होतो. मित्रानो कोणी रात्री फोन करत असेल तर कृपया फोन उचला. तो खरोखरच कोणत्यातरी अडचणीत आल्याशिवाय फोन करणार नाही. वाईट याचेच वाटते ज्यांनी फोन उचलले नाहीत त्यांनी आज भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्ट टाकलेत.’

आत्महत्या करण्यापूर्वी संतोष गायकवाड यांनी मित्रांना पाठवलेला हाच तो मेसेज -