आनंदाची बातमी : डिसले गुरुजींच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 

आनंदाची बातमी : डिसले गुरुजींच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहेे. 

कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहेत. पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रक्कमेतील साडे तीन कोटींची रक्कम 9 देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकी एक होते.