सर फाऊंडेशनचे राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर
Sir-foundation-narishakti-puraskar-2022

Sir-foundation-narishakti-puraskar-2022
सोलापूर : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील तेरा कर्तृत्ववान शिक्षिकांचा राज्यस्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य महिला समन्वयक श्रीमती हेमा शिंदे - वाघ यांनी दिली.
पुरस्कार वितरण दि. 13 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पुरस्कार वितरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शकुंतला काळे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, सोलापूर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, एस सी आर टी पुणे चे उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, मॅडम सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण लोहार आदी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान, विद्यार्थी विकास व आनंददायी शिक्षण याचा विचार करून या पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.
यावर्षी च्या पुरस्कार विजेत्या मध्ये श्रीमती विद्या वामन शिर्के
(जिल्हा ठाणे ), श्रीमती वर्षा अशोक निशाणदार (जिल्हा कोल्हापूर), श्रीमती कल्पना विश्वास माने (जिल्हा बुलढाणा ), श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ (जिल्हा पुणे), श्रीमती नीता काळूजी तोडकर (जिल्हा वाशिम), श्रीमती लीना मारुती पोटे (जिल्हा सातारा ), श्रीमती श्वेता सचिन फडके (मुंबई उपनगर), श्रीमती सुजाता त्र्यंबकराव भालेराव (जिल्हा जालना ), श्रीमती कल्पना गोविंद घाडगे(जिल्हा सोलापूर), श्रीमती सुनंदा पंडित भावसार (जिल्हा नंदुरबार ) व श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत (जिल्हा जळगाव ) श्रीमती हेमलता यशवंत पाटील (जिल्हा धुळे ), श्रीमती सुनीता उत्तमराव वावधने (जिल्हा नांदेड ) यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सर चे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सोलापूर जिल्हा समन्वयक अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण व नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला असून घरबसल्या या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांना घेता येईल. सर फाऊंडेशन च्या SIR Foundation MH या फेसबुक पेज वर भेट देऊन हा कार्यक्रम सर्वानी पहावा असे आवाहन सर फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.