जगाच्या पोशिंद्याला सावरण्यासाठी तरुणाईची धडपड

जगाच्या पोशिंद्याला सावरण्यासाठी तरुणाईची धडपड

Social activities of the youth of Solapur

सोलापूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर सारख्या दुष्काळग्रस्त भागात भरपूर मोठ्या प्रमाणात महापूर आला होता, त्याचा खूप वाईट परिणाम शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावा लागलं होतं. हे  सोशल मीडियावरील फोटो आणि बातमी  पाहून जाणवत होतं.

हे फक्त पाहणं आणि त्यावर सोशल प्रतिक्रिया देण्यापेक्षा पुढे जाऊन त्या पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत करावी या हेतूने प्रियंका डोंगरे आणि श्रद्धा हुल्लेनवरू या युवतीने आपल्या मित्र मैत्रिणीच्या सहकार्याने मोठी मदत शहरातून उभी करण्यास सुरुवात केली.

कित्येक दानशूर लोकांकडून मदत घेऊन सोलापूर शहरलगतच असलेल्या सावळेश्वर गावाजवळ सीना नदी काठच्या पाटील वस्तीवर पहिली मदत पोहच करण्यात आले.

त्या वस्तीला सीना नदीच्या पुरचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसला होता. गावाला जोडणारे रस्ते खचले होते. प्रशासकीय मदत पोचणे अवघड असताना प्रियंका आणि श्रद्धा या युवतीने मोठ्या प्रमाणात तिथल्या शेतकरी कुटूंबाना प्रत्येकी गहू,तांदूळ, साखर, डाळ, चहापत्ती, राजगिरा लाडू आणि कपड्याच्या माध्यमातून मदत करण्यात आले. 

यावेळी गावातील माजी सरपंच श्री हणमंत पाटील, जीवन जाधव, रंगा पाटील गोपाळ डोंगरे,गणेश डोंगरे,साक्षी गवळी,प्रगती डोंगरे, श्रीवेणी आडम, बसवराज जमखंडी उपस्थित होते.

अजूनही काही गावांना मदत पोहच करायची आहे. त्यासाठी दानशूर नागरिकांनी  धान्य किंवा अन्य इतर मदत करावी.
संपर्क - 
प्रियांका डोंगरे-. 8390075075
श्रद्धा हुल्लेनवरु- 9881728749