सोशल मीडियावर 'वैभव विभूतीचे' ट्रेंड; वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा उपक्रम

सोशल मीडियावर 'वैभव विभूतीचे' ट्रेंड; वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा उपक्रम
Veerashaiva vision social media trend

सोलापूर : सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. 

त्याच पद्धतीने वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या वतीने 'वैभव विभूतीचे' हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले. 

'वैभव विभूतीचे' या  ट्रेंडद्वारे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वीरशैव धर्म आचरणाचा संदेश देण्याबरोबरच विभूतीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हीजन महिला आघाडी करत आहे. 

विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे  शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. विभूती शरीरासाठी खुप उपयुक्त मानण्यात येते. विभूतीमुळे डोकेदुखी व एलर्जी दूर होण्यास मदत होते. 

वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या 'वैभव विभूतीचे' या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुणतरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले. 

हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे, कल्पना तोटद,  रेश्मा निडगुंडी आदी परिश्रम घेत आहेत.