सोलापूर सर्वात शांत पोलिस आयुक्तालय!

सोलापूर सर्वात शांत पोलिस आयुक्तालय!

Solapur : Most Peaceful Commissionerate

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयाने केलेल्या कामगिरीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. सर्वात शांत पोलीस आयुक्तालय म्हणून सोलापूर पोलिस आयुक्तालयाचा गौरव करण्यात येणार आहे.

झी 24 तास यांच्यावतीने महाराष्ट्राची शान - मेन इन खाकी या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मुंबईमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पोलिस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

सोलापूर पोलीस आयुक्तालयास सर्वात शांत पोलिस आयुक्तालय या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे सन्मान स्वीकारतील. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सोलापूर पोलीस आयुक्तालयास गौरवण्यात येणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय आणि औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय यांना सर्वात शांत पोलिस आयुक्तालय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत कारवाईसोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सोलापूर शहर पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. लोकसहभागातून कोरोना संदर्भात जनजागृती केली. सर्व पोलीस ठाण्यासह शहर गुन्हे शाखेच्या पथकानेही उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्यावतीने सोलापूर पोलिसांचे अभिनंदन..