अंगावर गाडी घालून पोलिसाचा खून करणारा कुरेशी गेला येरवड्यात!

अंगावर गाडी घालून पोलिसाचा खून करणारा कुरेशी गेला येरवड्यात!

सोलापूर : बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करीत असताना पिकअप जीप पोलीस कर्मचारी रामेश्वर परचंडे यांच्या अंगावर घालून त्यांचा खून करणारा सराईत गुन्हेगार सुलतान याकुब कुरेशी याच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. 

अंगावर वाहन घातल्याने 23 मे 2020 रोजी परचंडे हे शहीद झाले होते. फौजदार चावडी तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.घरातील उत्तर कसबा परिसरातील हाजीमाई चौक या भागात आरोपी सुलतान राहण्यास आहे.आर्थिक फायद्यासाठी तो गुन्हेगारी क्षेत्रात उतरला. त्याने शहरातील कुरेशी गल्ली,पाणीवेस,दत्त चौक,पंच कट्टा विजापूर वेस,शुक्रवार पेठ,उत्तर कसबा परिसर,लक्ष्मी मार्केट मुल्ला बाबा,टेकडी खटीक मशिद माणिक चौक तसेच सोलापूर विजापूर महामार्ग परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

खून करणे,खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच पशु क्रूरता अधिनियमान्वये गुन्हे करणे खंडणी मागणे,जबरी चोरी करणे, प्राण्यांचा छळ करून त्यांची तस्करी करणे आदी गंभीर गुन्हे तो सर्रासपणे करीत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. असे गुन्हेगारी कारवाया करून आरोपीने सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण केली होती. त्याच्याविरुद्ध सन २०१२ पासून शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे.त्याच्यावर सन २०१९ मध्ये कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.मात्र त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही.त्याने २०२० मध्ये बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करीत असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर पिकअप वाहन घालून खून केला.

प्रकरणात त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी आरोपीला अटक केली.गोपी कडून होणाऱ्या गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याच्यावर स्थानबध्तेची कारवाई करण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे आरोपी सुलतान कुरेशी विरुद्ध कारवाई करून त्यास येरवडा कारागृह येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे.