पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटचे नूतनीकरण

पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटचे नूतनीकरण

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सोमवारी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते www.solapurcitypolice.gov.in या नूतन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

या संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम ड्रीम केअर डेव्हलपर्स यांनी केलेले आहे. www.solapurcitypolice.gov.in संकेतस्थळावर नागरिकांना विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात आले आहे.

नुतनीकरण केलेले नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे. ही वेबसाईट अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आली आहे. ही वेबसाईट डेस्कटॉप, लॅपटॉप व मोबाईलवर काही सेकंदात ओपन होणार आहे.

सिटीजन पोर्टलची लिंक सोलापूर शहर वेबसाईटला देण्यात आल्याने सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पध्दतीने तक्रार करता येणार आहे.

पोलीस आयुक्त ते सहा.पोलीस आयुक्त यांची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर, पोलीस ठाण्याचे पत्ता, चौकी, बीट मार्शल याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

वेबसाईट फेसबुक व ट्विटरशी कनेक्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोशल मिडीयाशी कनेक्ट होण्यास मदत होणार आहे.

या वेबसाईटवर आपले सरकार अॅपची डाऊनलोड/ओपन लिंक देण्यात आली आहे. गुगल मॅप वरुन पोलीस ठाण्याचे अचुक लोकेशन मिळवता येणार आहे.

आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शाखा यांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्वतंत्र अॅडमिन पॅनल दिलेले असल्याने वेबसाईटची दैनंदिन अद्यावत केली जाणार आहे. वेबसाईट युझर फ्रेंडली असल्याने वापर करण्यास सोपी आहे.

वाहतूक शाखेशी संबंधी नियम व दंड याबाबतची माहिती उपलब्ध आहे. महिला व नागरीक यांच्या सुरक्षेविषयी माहिती सेफ्टी टिप्स या टॅबमध्ये
उपलब्ध आहे. सायबर सुरक्षेवर विशेष माहिती उपलब्ध आहे. उपयुक्त संकेतस्थळ या टॅबमध्ये इतर आयुक्तालय तसेच वरिष्ठ कार्यालयाचे संकेतस्थळाचे
लिंक देण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तालय संबंधीत माहिती अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे
विविध उपक्रमाचे जनतेसाठी लेटेस्ट न्युज, न्युज अॅन्ड इव्हेन्टस या टॅब मधुन मिळणार आहेत. टेंडर या टॅबमधुन निविदा डाऊनलोड करुन घेता येणार आहेत.

पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उप-आयुक्त बापू बांगर (गुन्हे/विशा), वपोनि. संजय साळुंखे गुन्हे शाखा, वपोनि सुनिल दोरगे सायबर सेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक बायस, पोह/देवपूत्र मरेड्डी, पोअं/इब्राहिम शेख व पो/वसीम शेख, पोअं/दिपक जाधव, पोअं/अर्जून गायकवाड तसेच ड्रीम केअर डेव्हलपर्स विवेक मेंगजी व त्यांची टीम यांनी संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यास परिश्रम घेतले आहे.