काळवीट शिकाऱ्याने पंढरपुरात घेतला होता आश्रय; वन्यजीव विभागाने केली अटक

काळवीट शिकाऱ्याने पंढरपुरात घेतला होता आश्रय; वन्यजीव विभागाने केली अटक

सोलापूर : माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज यांनी वन्यजीव काळवीट शिकार गुन्ह्यामधील फरार आरोपी समीर रवी चव्हाण यास आज दिनांक ०१/१०/२०२१ रोजी सापळा रचून अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षी अभयारण्य uनान्नज यांच्याकडील गंगेवाडी येथे दिनांक २१/७/२०२१ रोजी आरोपी समीर रवी चव्हाण व इतर तीन आरोपी यांनी काळवीट शिकार करुन त्याचे मांस खाणे व विक्री करणे असा गुन्हा केला होता. 

माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज यांच्या कर्मचाऱ्यांनी  आरोपी व मुद्देमाल हस्तगत केला होता. परंतु समीर रवी चव्हाण हा मुख्य आरोपी फरार झाला होता. सुमारे दोन महिने त्याने वन्यजीव विभागाच्या पथकास हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु पुणे वन्यजीव
विभागाचे वनसंरक्षक रमेश कुमार, विभागीय वनअधिकारी भूरके, सहाय्यक वनसंरक्षक वाकचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
शुभांगी जावळे वनपरिक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज टीमने धडाडीची कामगीरी पार पाडून फरार आरोपी जेरबंद करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या.

हाकिकत आज दिनांक ०१/१०/२०२१ रोजी पहाटे च्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शुभांगी जावळे व त्यांची टीम वनपाल श्री ए.ए.मुंढे, वनपाल श्री जी.डी.दाभाडे, वनरक्षक श्री ए.ए.फरतडे, श्रीमती आर.डी सोनटके, श्रीमती ललिता बड़े व इतर कर्मचारी मारुती गवळी, बाबासाहेब साठे, बाळू बोराडे, दत्तात्रय कसबे, बालाजी हुक्के, सोमनाथ धारेराव, श्रीकांत लामकाने, शिवकुमार मोरे इत्यादी कर्मचारी यांना समवेत घेवून खबर मिळाल्याच्या आधारे उस्मानाबाद जिल्हातील एका ठिकाणी आरोपी लपला आशी बातमी मिळाल्याने वन्यजीव टीमने त्या ठिकाणी धाड टाकली. परंतु आरोपीने तेथून पलायन केले. पुन्हा वन्यजीव टीमचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर आरोपीचा माघोवा काढुन सदर मुख्य आरोपी पंढरपूर येथे लपला असल्याचे उघडकीस आले. स्थानिक पंढरपूर शहर पोलीस उपनिरीक्षक श्री भागवत साहेब व त्यांची टीम यांच्या मदतीने संयुक्त रित्या मोहीम राबवून आरोपीस अथक परिश्रमानंतर जेरबंद करुन अटक केली.

श्रीमती शुभांगी जावळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अधिपत्याखाली यशस्वी रित्या मोहीम पार पाडली. पुढील तपास चालू असुन प्रकरण न्याय प्राविष्ट करण्यात
येत आहे.