महापालिकेच्या जागेतून चंदन चोरी! वाचा कुठे घडला प्रकार..

महापालिकेच्या जागेतून चंदन चोरी! वाचा कुठे घडला प्रकार..

Solapur-Mahanagarpalika-Chandan-Chori-News

सोलापूर : विजापूर रोड परिसरातील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील चंदनाची पाच ते सहा झाडे दोन दिवसांपूर्वी तोडली आहेत. झाडे तोडून चंदन चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने चंदनाची झाडे तोडली असल्याचे दिसून येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील कार्यालयाच्या समोरच हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी वॉच ठेवून रात्रीच्या वेळी हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे.

कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी चंदनाच्या झाडांमधील गाभा काढून चोरून नेला आहे. चोरीला गेलेल्या चंदनाची अंदाजे रक्कम 1 लाखाच्यावर असण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे उद्यान विभाग यांच्याकडून  अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.