रोख बक्षिसाची संधी! ‘माझा प्रभाग.. माझा नगरसेवक’ विषयावर निबंध स्पर्धा

रोख बक्षिसाची संधी! ‘माझा प्रभाग.. माझा नगरसेवक’ विषयावर निबंध स्पर्धा

Solapur Mahanagarpalika Maza Prabhag Maza Nagarsevak Spardha

सोलापूर : काही दिवसांनी सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुका पार पाडणार आहेत. प्रभागातून निवडून महापालिकेवर लोकप्रतिनिधी (नगरसेवक) म्हणून जाण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नाची पराकाष्ठा करत राहतो. यातून नागरिकांना स्वप्नांच्या दुनियेत बसविण्यात तरबेज होतात. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणूका आले की, नागरिक पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत कधी जातो हेच कळत नाही. यासाठी सुर्योदयापासून ते रात्री दररोज रिक्षांमधून स्वप्नांची दुनिया दाखवण्यासाठी स्पीकरवर सांगितले जाते, याचे काही नागरिकांनासुध्दा आनंद वाटतो अन् काही जणांना कंटाळा. आता सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होतील. याचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनने सर्वच घटकांसाठी '' माझा प्रभाग.. माझा नगरसेवक " या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिली आहे.

शब्दांची संख्या ५०० मध्येच मर्यादित आहे. ही निबंध स्पर्धा सर्व गटांसाठी आणि सर्वांसाठी खुली असून विनामूल्य आहे. मराठीत लिहून रविवार दि. २० मार्च अखेरपर्यंत सोलापूरच्या पूर्व भागातील दत्तनगर चौकाजवळील सरगम चाय पे चर्चा येथे बंद पॉकीटात आणून द्यावेत.

प्रथम क्रमांक - १५०१ /- पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स श्रीधर वडनाल यांच्याकडून  
द्वितीय क्रमांक - १००१ /- लक्ष्मण दोंतूल यांच्यातर्फे तर, 
तृतीय क्रमांक - ७५१ /- सुरुचि नमकीन नराल बंधू यांच्या वतीने देण्यात येईल. तसेच विजेत्यांसह सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

यानिमित्ताने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये स्वच्छ सोलापूर.. सुंदर सोलापूर.. आणि ग्रीन सोलापूर.. यासाठी प्रयत्न करतील. यासंदर्भात सोलापूर महापालिकेच्या दर महिन्याला होणाऱ्या जनरल बैठकीत आपल्या सोलापूरकरांसाठी आवाज उठवतील. अशी आशा करुयात. तसेच या आभासी निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूरकर सहभागी व्हावेत, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, अंबादास आधेली, गोविंद केंची, बालाजी कुंटला, प्रा. अनुप अल्ले, नवनीत पोला यांनी केले आहे.