मित्राला दारु प्यायला नेले आणि केला खून!

मित्राला दारु प्यायला नेले आणि केला खून!

Solapur Murder News

सोलापूर : मुळेगाव परिसरात रिक्षाचालक असलेल्या तरुणाचा मोठ्या दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना बुधवारी घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आणि गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अवघ्या बारा तासांत सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीस अटक केली. 

सुरेश बबन गायकवाड़ (वय 26, रा. मुळेगाव भीम नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात रवी बाबू रणखांबे (वय 37) याला अटक करण्यात आली आहे.मृत सुरेश हा भाड्याची रिक्षा चालवत होता. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दोन मित्रांनी सुरेशला बोलावून नेले. रात्री गेलेला सुरेश पुन्हा न आल्याने लहान भाऊ आणि आई यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी 6 वाजता सुरेशचा मृतदेह बिराजदार यांच्या शेतात सापडला. सुरेशच्या डोक्याला मोठी जखम दिसून आली आणि बाजूला मोठा दगड पडला होता. 
 याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या परिसरातील दारुच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गावकर्‍यांसोबत चर्चा केली. यानंतर रणखांबे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. त्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला. पूर्वी झालेल्या किरकोळ कारणावरून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास जगताप, नेताजी बंडगर, माधुरी तावरे, गायकवाड, नासिर शेख, सुनील बनसोडे, फयाज बागवान, अनिस शेख, शशी कोळेकर, बिराजदार, देवा सोलंकर, अशोक खवतोडे, शंकर मुजगोंड, राजु इंगळे, रवी हटकिळे यांच्या पथकाने केली आहे.