रेल्वेच्या अतिक्रमण कारवाईला जिल्हा न्यायालयाची स्थगिती

रेल्वेच्या अतिक्रमण कारवाईला जिल्हा न्यायालयाची स्थगिती

सोलापूर : रेल्वे प्रशासनाने लक्ष्मी नगर, हत्तुरे वस्ती परिसरातील काही नागरीकांना नोटीस देऊन चौकशी घेवुन अतिक्रमण काढून टाकणेसंबंधीचा दि. २९/०४/२०२२ रोजी आदेश पारित केला होता 

या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायाधिश एम . आर . देशपांडे यांच्याकडे आज रोजी सुनावणी झाली. लक्ष्मी नगर येथील 17 नागरीकांनी याचीका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचे वकिल व्हि. एस. आळंगे यांनी याचीकाकर्ते गेल्या 25-30 वर्षापासुन सदर जागेत कुंटुंबासमवेत राहतात. त्याचा पुरावा म्हणुन आधार कार्ड , लाईट बिल, सो.म.पा कर बील वगैरे पुरावे आहेत व इस्टेट ऑफीसर यांनी याचिकाकर्त्यांना योग्य व पुरेसी संधी म्हणणे मांडण्यासाठी दिली नाही व नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग केला आहे.

सदर युक्तीवाद ग्राह धरून इस्टेट ऑफीसर मध्य रेल्वे , सोलापूर यांचा 29/04/22 च्या अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेशास     
स्थगिती दिली. 

सर्व याचीकाकर्तां तर्फे  ॲड.व्हि.एस.आळंगे, अॅड . अमित आळंगे ॲड.सविता बिराजदार, ॲड.राहुल गायकवाड, ॲड. शुभम माने यांनी काम पाहीले.