भारीच..! ‘सिंहगड’च्या ऋतुजाला १२.५ लाखाच्या पॅकेजची नोकरी

भारीच..! ‘सिंहगड’च्या ऋतुजाला १२.५ लाखाच्या पॅकेजची नोकरी

Solapur Sinhagad College News

सोलापूर : सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही ठिकाणी  पगारकपात होत आहे. नवीन नोकरीच्या संधी सोडा, आहे त्या नोकऱ्या टिकवणे मुश्कील झाले असताना सोलापूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागात यंदा अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऋतुजा गायकवाड ला 'स्नोफ्लेक' या सॉफ्टवेअर कंपनीने संगणक अभियंता पदासाठी  १२.५० लाख प्रतिवर्ष इतके पॅकेजची नोकरी देऊ केली आहे.

केगाव च्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ऋतुजा सध्या अंतिम वर्षाचा अभ्यास करतीये, पदवी चे अंतिम वर्ष संपतानाच सोलापूरच्या तरुण विद्यार्थिनीला  एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात सोलापूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण ७५%  विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्याद्वारे कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झाली आहे. यात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असून  कोग्नीझंट, परसिस्टंट, ऍकसेनचर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इत्यादिसह  ३१ कंपन्यांचा   समावेश आहे.याबरोबरच  सन २०२०-२१ या चालू वर्षातील देखील विद्यार्थ्यांचे ऍक्सेनचर, कोग्नीझंट, बिरलासॉफ्ट, इन्फोसिस, स्नोफ्लेक, टीसीएस, बायजू'ज या नामवंत कंपन्या मध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तसेच या विद्यार्थ्यांना कमीत कमी ३.५ लाख पासून  ते १२.५ लाख पर्यंत वार्षिक पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी व्यवहारे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे यांनी अभिनंदन केले आहे. सिंहगड सोलापूर मधील  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांत आनंदाचे वातावरण आहे.
--
लॉकडाऊन मुळे नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला असूनसुद्धा  यंदाच्या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट मध्ये चमकदार कामगिरी केली आहे, या विद्यार्थ्यांची प्रथम वर्षांपासूनच तयारी करून घेतल्यामुळेआत्मविश्वास निर्माण झाला तसेच महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो परिणामी  प्लेसमेंट च्या विविध राऊंड मध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली.
- डॉ. शंकर नवले
एन बी एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर