भरधाव स्कॉर्पिओ झाडाला धडकली; सोलापुरातील तिघांचा मृत्यू

भरधाव स्कॉर्पिओ झाडाला धडकली; सोलापुरातील तिघांचा मृत्यू

Solapur vijapur road accident news

सोलापूर : विजापूर रोडवरील औराद येथून सोलापूरकडे येत असताना भरधाव कार झाडाला धडकली. या अपघातामध्ये सोलापुरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी आहे. हा अपघात रविवारी पहाटे झाला आहे.

किशोर अण्णाराव भोसले (वय 45, रा. सळई मारुती उत्तर कसबा, सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय 32, रा. निराळे वस्ती, सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45 मोदी, सोलापूर) अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत. राकेश हूच्चे हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

एमएच 13 झेड 9909 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून सर्वजण औराद येथून सोलापूरकडे निघाले होते. विजापूर रोडवरील तेरा मैल परिसरात वकील वस्ती येथे भरधाव वाहन झाडाला धडकले. या घटनेत वाहनांमधील तिघेही जखमी झाले. त्यांना मित्र संभाजी जुगदार यांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद शासकीय रुग्णालयातील सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

व्यंकटेश हे प्रकाश योजनाकार म्हणून काम करत होते. किशोर हे मंडप आणि लाईटचे काम करायचे. योगेश हे जनरेटर पुरवण्याचे काम करत होते, अशी माहिती निकटवर्तीयांनी सांगितली आहे.

स्कॉर्पिओ वाहनातून चौघे औराद याठिकाणी कशासाठी गेले होते हे अद्याप समजले नाही.