पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कोणाची कुठे झाली नियुक्ती

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कोणाची कुठे झाली नियुक्ती

Solapur city police officer transfer news 

सोलापूर : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बुधवारी रात्री सोलापूर शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी सदर बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक सर्जेराव पाटील यांना दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. 

सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची सदर बाजार पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. 

डान्सबार प्रकरणावरून विजापूर नाका येथून पाठवण्यात आलेले पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

पहा कोणाची कोठे झाली बदली-