पीएसआय संदीप शिंदे यांना पुन्हा गुन्हे शाखेची जबाबदारी!

पीएसआय संदीप शिंदे यांना पुन्हा गुन्हे शाखेची जबाबदारी!

Solapur crime branch PSI Sandeep Shinde News

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना पुन्हा एकदा गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या नियुक्तीचा आदेशही दिला आहे.

काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली केली होती. आजवर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेत काम करण्याची संधी त्यांना दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने बनावट डिझेल खरेदी - विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली होती.

गुन्हे शाखेचे उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी आजवर धाडसी कारवाया केल्या आहेत. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना पुन्हा एकदा गुन्हे शाखेत काम करण्याची संधी दिल्याने सकारात्मक चर्चा सुरू आहे.