फ्लॅटवर सुरू होता आयपीएल क्रिकेटचा सट्टा बाजार!

फ्लॅटवर सुरू होता आयपीएल क्रिकेटचा सट्टा बाजार!

सोलापूर : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी यांना सोलापूर शहरातील आयपीएल क्रिकेट सट्टा चालकांची माहिती काढुन त्यावर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते.

अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी प्राप्त गोपनिय माहिती वरुन व दिलेल्या आदेशाप्रमाणे पोसई/ संदिप रंगराव शिंदे यांनी त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांच्या मदतीने अवंती नगर भाग-2 मधील पर्ल हाईटसच्या फ्लॅट नं.02 या ठिकाणी छाप्याची कारवाई केली. आरोपी नामे 01) चेतन रामचंद्र वन्नाल, वय-26 वर्षे, रा. गांधी नगर झोपडपट्टी नं-3, वेकंटेश मेडीकल शेजारी, अक्कलकोट रोड, सोलापूर, 02) विग्नेश नागनाथ गाजूल, वय-24 वर्षे, भद्रावती पेठ, सोलापूर हे आय.पी.एल. क्रिकेट सामन्यांवर आयपीएल सामना चालु असताना टी.व्ही. वरील चालु क्रिकेट मॅच पाहत, टॉस कोण जिंकेल, 6,10,15 व 20 ओव्हर्स (सेशन) मध्ये किती धावा होतील व शेवटी सामना कोणती टिम जिंकेल, यावर मोबाईलद्वारे दररोज सट्टा लावणारे इसमांकडुन फोनवरुन सट्टा घेवुन त्याचा हिशोब पाहत (लिहीत) असताना मिळुन आले. 

सदर इसमांना सटटेबाजांकडुन जमा होणारी रक्कम व त्यांना मिळालेली रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा लाभ सट्टा चालविणारे मालक भागीदार यांना होत असुन, या मधील सर्व भागीदार हे बक्षिसाच्या रकमेचे अमिष दाखवुन सर्व सामान्य लोकांची फसवणुक करीत असताना मिळुन आले. तसेच त्यांनी कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या अनुषंगाने इतराच्या जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणुन साथीच्या रोगाचा संसर्ग पसरवण्याची हयगयीची कृती केली. नमुद आरोपीसह त्यांचे साथीदारांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेस महाराष्ट्र जुगार कायदा कलम-4, 5 सह भा.दं.वि. कलम 420,109,269,336 सह, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2005 चे कलम 66 डी सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 चे कलम-51 (ब), सह साथरोग अधिनियम-1897 चे कलम-3 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास संजय तु. साळुंखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करीत आहेत. 

गुन्ह्याच्या तपासात आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल, वय-26 वर्षे, रा. गांधी नगर झोपडपट्टी नं-3, वेकंटेश मेडीकल शेजारी, अक्कलकोट रोड, सोलापूर याने दिलेल्या माहितीवरुन संजय तु. साळुंखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी पोसई/ संदिप शिंदे व गुन्हे शाखेकडील पुरुष व महिला अंमलदारासह गुलबर्गा येथे जाऊन बसवेश्वर नगर गुलबर्गा येथील घरातून  आरोपी नामे अतुल सुरेश शिरशेट्टी रा.अवंती नगर, सोलापूर व प्रदिप मल्लय्या कारंजे रा.75/22, भवानी पेठ, सोलापूर यांना ताब्यात घेतले.

त्यांचेकडून3 लॅपटॉप, 1 टॅब, 13 मोबाईल हॅडसेट, 1 माईक, 3 लॅपटॉप चार्जर, 1 हॉट लाईन मशीन 13 मोबाईल जोडलेले असलेला, मोडेम, सेट टॉप बॉक्स, सॅमसंग कंपनीची टि.व्ही., डि.व्ही.आर इ.3,33,200/- रूपये किंमतीचे आय पी एल सट्टा खेळण्याकरीता वापरात येणारे साहित्य व अंदाजे 30,00,00/- किंमतीची वाहने त्यात 1 टाटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार तिचा क्रमांक के.ए.51 एम.पी.9955 व मारूती सुझुकी ब्रिाजा तिचा क्रमांक एम एच 13 डी ई 7172 जप्त करण्यात आलेली आहेत. आतापर्यत सदर गुन्हयात वापरलेली वाहने, सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य व 3,40,000/- रु रोख रक्कम असा मिळुन एकुण 38,44,200/- रूपयांचे (अडोतीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रु) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
सदर गुन्ह्राचे तपासात अटक आरोपींकडे केलेल्या तपासा दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकातील शहरात असलेल्या एजंटाकरवी आयपीएल क्रिकेट सट्टा स्विकारलेला आहे व एजंटामार्फत सर्व सामान्य माणसाला जास्तीचे पैसे देण्याचे अमिष दाखवुन स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी सर्वसामान्य लोकांची फसवणुक केल्याची माहिती उजेडात आली आहे. तपासिक अधिकारी यांचेकडून यातील आरोपी क्र.04 व 05 यांनी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल मध्ये असलेल्या डाटाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे कौशल्याने तपास करुन गुन्हयातील पुरावा हस्तगत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालु आहे. 


सदरची कामगिरी मा. पेालीस आयुक्त अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे बापु बांगर, मा. सहा पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि गुन्हे शाखा संजय तु. साळुंखे, पोउपनि संदिप शिंदे, पोहेकॉ औदुंबर आटोळे, दिलीप नागटीळक, पोना जयशिंग भोई पोकॉ संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, गणेश शिंदे, सागर गुंड, विदयासागर मोहिते, सोमनाथ सुरवसे, अश्रुभान दुधाळ, कुमार शेळके, सनी राठोड, सुरज देशमुख, मपोका आरती यादव, चालक पोना राहुल गायकवाड, नेताजी गुंड या पथकाने केली आहे.