मोबाईल असोसिएशनच्यावतीने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

मोबाईल असोसिएशनच्यावतीने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

सोलापूर : व्यवसायासोबत सामाजिक भूमिकेतून कार्यरत असलेल्या सोलापूर मोबाईल असोसिएशनच्या वतीने शनिवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवस्मारक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने तयारीसाठी सोमवारी सोलापूर मोबाईल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची बैठक गणराज मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सोलापूर मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष हिशाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. व्यवसायवाढी सोबतच सामाजिक भूमिकेतून यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करावे अशी सूचना शेख यांनी मांडली. सर्व सदस्यांनी या सूचनेला अनुमती देत अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. 

शनिवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवस्मारक सभाग्रहात रक्तदान शिबिर होणार आहे. सोलापुरातील विविध मोबाईल दुकानदार व्यवसायिकांनी सोबतच ग्राहकांनीही या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केली आहे. या बैठकीस महाराष्ट्र मोबाइल असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश चिंचोळी, सोलापूरचे उपाध्यक्ष विजय नवले, रवींद्र कोळी, सेक्रेटरी सचिन पाटील, सदस्य ऋषिकेश सुत्रावे, सचिन पत्तेवार, युन्नूस खान, गोविंद सचदेव, राजू बिराजदार, रमेश भोसले, लक्ष्मण पाटील, विनोद टेके, श्रीनिवास मुनगापाटील आदी उपस्थित होते.

मोबाईल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 100 पेक्षा अधिक लोक सहभागी होणार आहेत. येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये ग्राहकांना ऑनलाइन पेक्षा स्वस्त मोबाईल सोलापुरात मिळावेत तसेच विविध ऑफर देण्यात यावेत या अनुषंगाने मोबाईल असोसिएशनच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
- हिशाम शेख, 
अध्यक्ष, सोलापूर मोबाईल असोसिएशन