सोलापूर-उजनी जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

सोलापूर-उजनी जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीच्यावतीने सोलापूर ते उजनी अशी दुहेरी पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामास आज बुधवारी पुणे रोड येथील डाळींब संशोधन केंद्र परिसरात सुरुवात करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व महापौर श्रीकांचना यन्नम आणि मान्यवरांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करण्यात आले. 

यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली,परिवहन सभापती जय साळुंखे,आयुक्त पी.शिवशंकर, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे,गटनेते रियाज खैरादी तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढंगळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

सोलापूर शहरासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईन पाईप लाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ आज बुधवारी पुणे रोड येथील डाळींब संशोधन केंद्र परिसरात करण्यात आला. 

सोलापूर शहरातील हा प्रकल्प महत्त्वकांक्षी असून यामुळे सोलापूर शहरतील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हे प्रकल्प सर्वांना घेऊन लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. दुहेरी पाईपलाईनचे काम गेल्या दीड वर्षापासून ही योजना प्रलंबित असून पाईपलाईनचा आज प्रत्यक्ष कामास सुरूवात होत आहे. ही योजना दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावे. सोलापूर शहरासाठी ही योजना महत्वाचे असून सर्वांनी पक्ष बाजूला ठेऊन सर्वानी मिळुन हे दुहेरी पाईप लाइनचे काम पूर्ण करू अशी अपेक्षा खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केली.