सोलापूर तालुका पोलिसांचा गॅस अड्ड्यावर छापा; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर तालुका पोलिसांचा गॅस अड्ड्यावर छापा; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मौजे मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर गावाच्या शिवारामधील धवलनगर येथील अवैधरित्या चालणा-या घरगुती गॅस टाक्यामधुन कमी किमतीने रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचे गोपनिय माहिती प्राप्त होती. 

त्या अनुषंगाने मा. तहसिलदार ता. दक्षिण सोलापूर यांच्याकडील पथक व सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी असे संयुक्त पणे धवलनगर मुळेगाव ता. दक्षिण सोलापूर येथे छापा टाकुन कारवाई करण्यात आली असुन मुख्य आरोपी 1) नागेश बाबु साखरे रा. धवलनगर, मुळेगाव, सोलापूर हा अवैधरित्या घरगुती गॅस विक्री करत असताना मिळुन आल्याने, त्याच्याताब्यातुन घरगुती गॅस टाक्य, इलेक्ट्रीक काटा, इलेक्ट्रीक मोटार असे साहित्य व सदर ठिकाणी अवैषरित्या गॅस रिक्षामध्ये भरत असताना 2) गणेष रामचंद्र जाधव, 3) मुनाफ जैनोददीन शेख, 4) किरण तानाजी मोरे 5) शेकांबुर खुदावंत नदाफ, 6) ज्योतीबा प्रकाष शिंदे 7)दशरथ शिवाजी मग्रुमखाने हे त्यांच्या रिक्षासह मिळुन आले, सदर ठिकाणावरून 15,21,000/- रू किमतीचा मुददेमाल  हस्तगत करण्यात आला आहे. मौजे मुळेगाव ता. दक्षिण सोलापूर चे तलाठी श्री. भिमाशंकर रामण्णा भुरले यांनी दिले फिर्यादी वरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, सुहास जगताप हे करीत आहेत.  
  
सदरची कामगिरी मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधिक्षक  सोलापूर ग्रामीण, श्री. अतुल झेंडे , मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. प्रभाकर शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर, यांच्या मार्गदर्शना मध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक सुहास जगताप व सपोनि अनिल देवडे, मसपोनि तावरे, सपोफौ/कपडेकर, सपोफौ गायकवाड, मपोह/वैशाली कुंभार, पोना/ राहुल कोरे, मपोना/चवरे, पोकाॅ/ शशि कोळेकर, किशोर सलगर, मोहन मोटे,  राजु इंगळे, मपोकाॅ/ अमृता जाधव, चापोना/ प्रशांत बेलभंडारे यांनी पार पाडली आहे.