शरद पवारांचा काँग्रेसला झटका; सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवारांचा काँग्रेसला झटका; सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर : ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल आणि काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले यांनी काँग्रेसला रामराम करत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पवार यांच्या उपस्थितीत आज हुतात्मा स्मृती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तोफिक शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले उपस्थित होते.

▪️हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या मेळाव्याचा पूर्ण व्हिडिओ पहा-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी काँग्रेसला रामराम करत आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे यातून दिसून येते.