लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांना ‘राष्ट्रवादी’त मोठी जबाबदारी

लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांना ‘राष्ट्रवादी’त मोठी जबाबदारी

सोलापूर : लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांना पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादीने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. 

लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेखा पुणेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे उपस्थित होते.

सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सोलापुरातील नाट्य व्यावसायिक गुरु वठारे यांच्यासह लावणीप्रेमींनीही आनंद व्यक्त केला आहे.