एसपी तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! पहा छायाचित्रे..

एसपी तेजस्वी सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! पहा छायाचित्रे..

सोलापूर : ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यातील 71 हातभट्टी असलेल्या ठिकाणी एका दिवशी कारवाई करण्यात आली. ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यातील ज्या ज्या गावात अवैध धंदे चालतात ती गावे पोलीस अधिकार्‍यांना दत्तक देण्यात आली आहेत.

आजवर अनेक अधिकार्‍यांनी दारु, मटका, जुगार यासह इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या आहेत, आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तनमुळे काय बदल होतील हे लवकरच दिसून येईल.

मुळेगाव तांडा येथे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भानुदास तांडा येथे अप्पर अधीक्षक अतुल झेंडे यांनी अचानक पाहणी केली. पोलीस अधीक्षक सातपुते यांनी तांड्यावरील तरुणांशी संवाद साधला. या व्यवसायापासून दूर कसे रहता येईल. तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि नागरिकांना लहान-मोठे उद्योग धंदे करण्यासाठी मदत करणे याबाबत त्यांनी संवाद साधला.


या परिसरातील हातभट्टी चालक राज चव्हाण यांनी आपली दारूची हातभट्टी जेसीबी मशीनच्या साह्याने स्वतःहून मोडून काढली. जिल्ह्यामध्ये 71 ठिकाणी हातभट्टी दारू गाळण्यात येते. ही गावे प्रत्येक पोलिस अधिकार्‍याला दत्तक देण्यात आली आहेत. काही एकूण दीडशे लिटर हातभट्टी दारू, 48200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. तर अकराजणांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे श्रीमती सातपुते, श्री. झेंडे यांच्यासह पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अरुण घुगे, काजुळकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत बेगमपूर येथे हातभट्टी दारू गाळणार्‍या भट्टीवर छापा मारला. तेथील आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला. त्याठिकाणी एकूण 10 बॅरल , 2000 लिटर - 53,750 रुपये किंमतीचे गुळमिश्रित रसायन मिळून आले. ते जागीच नष्ट करून आरोपी नामे दत्ता तुळजाराम भोई याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात खझउ 328, सह दारूबंदी कायदा कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  ही कामगिरी  तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार सचिन वाकडे, धनाजी गाडे, समीर शेख, अनिसा शेख, सरस्वती सुगंधी, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.