कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं..!

कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं..!

आमदार रोहित पवारांकडून पंढरपूरच्या रिक्षाचालक तरुणाचे कौतूक

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी तरुणांमध्ये विशेष आकर्षक आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्याच्या विविध भागात आहे. कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसतं.. हे रोहित पवार सातत्याने सांगत असतात. 

आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील पदवीधर तरुण रविंद्र गोरे यांचे कौतूक केले आहे. रविंद्र हे गेल्या आठ वर्षांपासून पंढरपुरात डेटा ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. रोहित पवार यांच्या प्रेरणातून रविंद्र यांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या कामा व्यतिरिक्त रिक्षा चालण्याचा व्यवसाय करायला सुरवात केली आहे.

 


रोहित पवार यांच्या प्रेरणेतूनच हे शक्य झाल्याचे रविंद्र यांचे म्हणणे आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर रविंद्र यांनी पाठविलेले मेसेज आणि त्यांची छायाचित्रे शेअर करून राज्यातील युवकांची अशी प्रतिक्रिया ऐकून खूप समाधान वाटतं आणि अशा कष्टाळू, प्रामाणिक होतकरू युवांचा अभिमानही वाटतो, असे म्हटले आहे. 


राज्यातील युवाची अशी प्रतिक्रिया ऐकून खूप समाधान वाटतं आणि अशा कष्टाळू, प्रामाणिक होतकरू युवांचा अभिमानही वाटतो.
Posted by Rohit Rajendra Pawar on Sunday, 22 November 2020