हेल्मेटसाठी पोलिसांनी अडवल्यावर राग आला! अन् पुढे..

हेल्मेटसाठी पोलिसांनी अडवल्यावर राग आला! अन् पुढे..

Traffic-awareness-article-by-Deepali-Dhate-Ghadge

तो एक उमदा अतिशय देखणा तरुण, Sports बाइक वापरण्याची भारी आवड.. आज अगदी वा-याच्या वेगावर स्वार होऊन शहराच्या बाहेर Picnic spot ला मित्रांना भेटण्यासाठी स्वत:च्या शाही Sports bike वर निघाला होता. 

अचानक समोर पोलीसांची नाकाबंदी दिसली. खुपच रागात त्याने गाडीची Speed कमी केली. ' ----- ' एक शिवी तोंडातली तोंडात पोलीसांना हासडली व अनिच्देने त्याने बाजूच्या Traffic Police च्या जवळ bike थांबवली.

Traffic कर्मचारी यांनी विचारले, ' का रे ! helmet  कुठाय ? ' त्याने अतिशय उध्दटपणे हात मागे दाखवला. मागे हेल्मेट डिकीजवळ अडकवले होते. Traffic कर्मचारी यांनी विचारले, ' घातले का नाही ? ' तर त्याने बेफिकीरपणे मान फिरवली.

Police कर्मचारी यांनी लगेच त्याला दंडाची पावती दिली 500/- रु. तर त्याला केवढा राग आला. त्याने मनात म्हणाला, " गाडी माझी, डोके माझे, हेल्मेट माझे, ते घालायचे की नाही तो माझा अधिकार, हे का मध्ये - मध्ये करतात? यांना 100 - 200 रुपये दिले की शांत बसतात. बस पैशासाठी सगळं करतात." त्याने अतिशय उध्दटपणे 200 रु. पोलीस कर्मचारी यांना दाखवले व ' हे घ्या, अन् जाऊ द्या' असे म्हणाला.

पोलीस कर्मचारी त्याच्या जवळ आले. ते 200 रु. त्यांनी त्या मुलाच्या खिशात घातले व दंडाची पावती त्याच्या हातात देऊन गाडी जमा करायला सांगितले.
आता मात्र त्याला खूपच राग आला. त्याने दंडाची पावती घेऊन 500 रु दिले व तो झटक्यात निघाला. पण Traffic पोलीसांनी परत त्याला अडवलं व त्याच्या गाडीला लटकवलेले helmet त्याला घालायला लावले. अन स्वत: त्याचा belt गळ्याजवळ clip केला. अन त्याच्या पाठीवर थाप मारुन,' आता जा अन् फार उडू नकोस, जमीनीवर रहायला शीक, घरी आई - बाप वाट बघत असतात. ' असे म्हटले.

याला खूप राग आला या आगंतूक सल्ल्याचा ---- त्याने एक रागाचा कटाक्ष पोलीसाकडे टाकून गाडीला Kick मारली व निघाला.... 
4 - 5 Km गेला असेल तर समोर एक car कमी speed ने जात होती व याला तर fast पोहोचायचे होते. Car, त्याच्या बाजूला एका bike वर दोघे जण. याने विचार केला, ' हे काय बैलगाडी सारखे हळू चाललेत.'  म्हणून स्वत:ची  speed वाढवली.

अन् त्या car अन् bike ला over take करु लागला...  पण अचानक समोरून एक ट्रक येत होता. नेमके काय झाले त्याला कळाले नाही. पण कानाचे पडदे फाटतील असा ठो...ठो आवाज, जोर-जोरात ओरडल्याचा आवाज अन् डोके गरगर फिरल्याचा भास . थोड्या वेळाने याला गुंगीत असल्यासारखी जाग आली. हात-पाय हलवून पाहिले तर, पायातून रक्त वाहतेय, हात तर हलवताच येत नव्हता. गाडी बाजूला चेंदा-मेंदा होऊन पडलेली... त्याने थेाडी मान वळवून पाहिले तर जवळच त्या समोरच्या मुलांची बाईक चूरा झालेली. त्याच्या बाजूला एक जण रक्ताच्या थोरोळ्यात पडलेला, डोक्याचा चेंदा-मेंदा       झालेला. सोबतचा दुसरा मुलगा लांब पडलेला व त्याचे हेल्मेट त्याच्या पायाजवळ अन् डोक्यातून रक्ताचा पाट. जवळ जमलेल्या गर्दीची कुजबूज, " अरेरे बीचारे दोघे जागेवर गेले. " हा कदाचित हेल्मेटमुळे...

त्याचे डोके. सून्न अन् पुन्हा बेशुध्द..
जेव्हा हॉस्पीटलमधून सुट्टी भेटली, तेव्हा पहिल्यांदा जाऊन त्या traffic पोलीसांना भेटला व पाया पडला म्हणाला,' तुम्ही त्या दिवशी जर मला हेल्मेट घालायची, बेल्ट लावण्याची सक्ती केली नसती तर .....' 
" हेल्मेट घाला जीव वाचवा. "
ही लाईन त्यांनी यापूर्वी खुपवेळा वाचलेली पण त्याला आज त्याचा खरा अर्थ समजला. 
हेल्मेटची खरे तर कायद्यातच तरतुद आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील हेल्मेट सक्ती ही योग्यच असलेबाबत निर्वाळा दिला आहे. हेल्मेट न घालण्याबाबत मो.वा.काय.कलम 229/177 अन्वये दंड 500 रु. आहे, असा दंड केल्याने पोलीसांना स्वत:ला काही मिळत नाही, मिळतं फक्त कायदयान्वये एक जीव सुरक्षीत राखल्याचं समाधान...

भारतात दरवर्षी जवळपास दीड लाखाच्यावर व्यक्तींचा रोड ऍ़क्सीडेंटमध्ये मृत्यु होतो. त्यामधील 30 ते 32 टक्के दुचाकी स्वार हेल्मेट नसल्यामुळे मृत्यु पावल्याची नोंद आहे. त्यामुळे हेल्मेट घालणे ही सक्ती न समजता, स्वत:चा जीव वाचविण्यासाठी स्वत: केलेली कृती आहे असं समजावं. हेल्मेट नेहमी चांगल्या कंपनीचं ISI मार्क असलेलचं असावं आणि फक्त डोक्याला न अडकविता त्याचा बेल्ट देखील गच्च आवळलेला असावा. 

- डॉ. दिपाली धाटे- घाडगे,
पोलीस उप - आयुक्त
सोलापूर शहर