सोलापूर शहरातील ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर शहरातील ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापूर शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

सोलापूर सायबर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले विशेंन्‍द्रसिंग बायस यांची सदर बाजार पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक या ठिकाणी कार्यरत असलेले नितीन पवार यांची शहर वाहतूक शाखा या ठिकाणी बदली झाली आहे. बदली करण्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांचा सोलापुरातील कालावधी पूर्ण झाला आहे. येणाऱ्या काळात त्यांना प्रमोशन मिळणार आहे. प्रमोशनची यादी येईपर्यंत या अधिकाऱ्यांना आहे त्या ठिकाणी ठेवले जाईल अशी चर्चा होती मात्र आयुक्त अंकुश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी बदली केली आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची यादी पुढीलप्रमाणे -