‘स्पेनका’ची भरारी; गुणवत्तापूर्ण दूध मिळणार घरपोच!

‘स्पेनका’ची भरारी; गुणवत्तापूर्ण दूध मिळणार घरपोच!

युवा उद्योजक सुहास आदमाने यांची संकल्पना;
खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते स्पेनका मिल्कचे अनावरण

सोलापूर : स्पेनका मिनरल वॉटरचा उद्योग यशस्वी झाल्यानंतर सोलापूरचे युवा उद्योजक सुहास आदमाने यांनी स्पेनका मिल्कची सुरवात केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते स्पेनका मिल्कचे अनावरण करण्यात आले.

स्पेनकाची ही भरारी सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. उद्योग करताना कायमच सामाजिक भावना जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून सुहास आदमाने यांच्याकडे पाहिले जाते. शुद्ध, गुणवत्तापूर्ण मिनरल वॉटरचा व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर सुहास आदमाने यांनी आता स्पेनका मिल्कची सुरवात केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते स्पेनका मिल्कचे अनावरण करण्यात आले. 

जाहीरातीवर क्लिक करून अ‍ॅप डाऊनलोड करा - 


व्हिडीओ पाहा - 

स्पेनका मिल्क अनावरणाच्या निमित्ताने स्मार्ट सोलापूरकर डिजीटल मिडीया पोर्टलने श्री. सुहास आदमाने यांच्याशी संवाद साधला.

स्पेनका मिल्कचे अनावरण झाले. काय सांगाल? 

आमच्या कुठल्याही नव्या प्रकल्पाची सुरुवात ही शिवछत्रपती आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभहस्ते होते. स्पेनका मिल्कचे अनावरणही छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पेनका मिनरल वॉटर या उत्पादनाला आजपर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! स्पेनका मिल्क या नव्या उत्पादनाला तुमचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा वाटते.

स्पेनका मिनरल वॉटरला किती वर्षे झाली?
स्पेनका मिनरल वॉटरला पाच वर्षे झाली. स्पेनकाने गेल्या पाच वर्षात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. 

स्पेनका मिल्कची संकल्पना कशी आली?
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण दूधाची आवश्यक आहे. लोकांना गुणवत्तापूर्ण दूध मिळायला हवे असे अनेक दिवसांपासून डोक्यात होते. याचा अभ्यास करून आम्ही स्पेनका मिल्क बाजारात आणले आहे. 

बाजारात आधीच एवढे ब्रॅण्ड आहेत. स्पेनका मिल्क का घ्यावे ?
स्पेनका हे नॅचरल मिल्क आहे. दूधावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येणार नाही. गाईचे दूध काढल्यानंतर पुढच्या सहा तासांच्या आत ते ग्राहकांपर्यंत पोचणार आहे.

या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला आहे? 
स्पेनका मिल्कच्या माध्यमातून 25 पेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे.

स्पेनका मिल्कचे वितरण कसे असणार आहे?
स्पेनका मिल्कचे उत्पादन मोहोळ तालुक्यात होणार आहे. स्पेनकाचे दूध कोणत्याही दुकानात मिळणार नाही. स्पेनका ई स्टोअर हे अ‍ॅप डाऊनलोड करून ग्राहकांना आपली दूधाची ऑर्डर नोंदविता येणार आहे. स्पेनकाचे डिलीव्हरी बॉय ग्राहकांच्या घरापर्यंत बाटलीबंद दूध पोच करणार आहेत. अशा प्रकारची दूधाची वितरण प्रणाली काही कंपन्यांकडून मोठ्या शहरांमध्ये सुरु आहे. स्पेनका मिल्क सध्या सोलापूर आणि पुणे या शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

स्पेनका मिल्क कसे लिटर आहे?
90 रुपये लिटर असा स्पेनका मिल्कचा भाव आहे. पॅकिंग बॉटलमध्येच दूधाचे वितरण होणार आहे.