विजय कन्स्ट्रक्शनला आयुक्तांकडून दुप्पट दंडाचा दणका  

विजय कन्स्ट्रक्शनला आयुक्तांकडून दुप्पट दंडाचा दणका  

विजय कन्स्ट्रक्शनला आयुक्तांकडून दुप्पट दंडाचा दणका
 
 
 सोलापूर : डांबरीकरण केलेला रस्ता दुसर्‍याच दिवशी उखडण्याचा प्रताप विजय कन्स्ट्रक्शनने केला होता. यावर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देत दुप्पट दंडाचा दणका दिला आहे. यामुळे बिल्डरांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

जानकर नगर येथे वाय चौक येथून आमराईकडे जाणार्‍या रस्ता डांबरीकरणाचे काम 19 जून 2022 रोजी करण्यात आले. या रस्त्यालगत जानकर नगर येथे विजय कन्स्ट्रकशन या बिल्डरकडून जयप्रकाश हाईट्स या इमारतीचे बांधकाम गेल्या वर्ष-दिड वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्याकडून ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी गेल्या वर्षभरातच खराब असणारा रस्ता खोदणे अपेक्षित होते. परंतु 19 जून रोजी रस्ता डांबरीकरण करताच 20 जून रोजी तो ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्याचा प्रताप संबंधीत बिल्डरकडून करण्यात आला. परिणामी येथील नागरिकांनी व एकात्मता बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे सचिन शिराळकर यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रार केली. यावर आयुक्तांनी तक्रारींची तत्काळ दखल घेत संबंधीत बिल्डरला दुप्पट दंडाची आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ता खोदण्याबाबत घेतलेली परवानगी आणि या कारवाईबाबत विजय कन्स्ट्रकशनचे अकलवाडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.