विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ!

विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ!

28 व्या वर्षी अजून नीटसं मिसरूटही न फुटलेली यांची पोरं थेट कॅबिनेट मंत्री करायला येतात, ज्याला नीट चार शब्द बोलता येत नाही त्याला खासदारकीची स्वप्नं पडायला लागतात, आमदार होतात, ज्याचा बाप कित्येक वर्षे आमदार, मंत्री होता त्यांची मुलगी राज्यमंत्री करायला वेळ आहे मात्र बाप शेतात राबत असताना शेतकऱ्यांचा पोरगा अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतोय त्याला हे सरकार अधिकारी होण्यासाठी नीट व्यवस्था निर्माण करू शकत नाही, याची लाज स्वतः उद्धव ठाकरे आणि या सरकारच्या कर्त्याधर्त्या सर्वांनीच बाळगली पाहिजे. एका अधिकारी झालेला पण या ठाकरे सरकारच्या गलथानपणामुळे MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झालेल्या तरुण स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केल्याचं कळलं आणि खूप वाईट वाटलं. आतून अस्वस्थ आहे. खरंतर ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, या राज्यात गेल्या दोन वर्षांपासून जे काही अंधाधुंद चाललंय त्याचा हा परिणाम आहे, मागच्या मार्च महिन्यात जेव्हा MPSC ची पोरं रस्त्यावर उतरली होती तेव्हाच मी लिहिलं होतं की हे दळभद्री सरकार mpsc च्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. या फोटोतले चेहरे लक्षात ठेवा त्यावेळी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून घामांच्या धारात हे भिजून निघाले होते. पण घरकोंबडा बनून खुरड्यात बसलेल्या सरकारला जागच आली नाही, ना त्या अधिकारी होण्यासाठी आयुष्य खर्चायला आलेल्या पोरांची कीव आली.

गावगाड्यातनं शहरात जाऊन अभ्यास करून आयुष्याची अधिकारी पदाची स्वप्नं रंगवणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा विडा या ठाकरेंच्या तिघाडी सरकारने उचलला, आज स्वप्नील गेला, असे अजून किती स्वप्नील जाण्याची वाट हे सरकार बघणार आहे? निवडणूकीसाठी पावसात भिजणारे पाहून महाराष्ट्र फसला मात्र या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी घामांनी भिजलेले हे दोन वाघ महाराष्ट्राने तेव्हाहइ पाहिले, आजही त्यांनीच पुन्हा आवाज उठवला. तरुण पोरांच्या अन्यायावर बोलायला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रामभाऊ सातपुते आहेतच. कारण त्यांचा बाप शेतात राबत होता, मातीचे चटके यांच्याही बापाला बसले आहेत, रानात राबल्यावर त्यांच्याही हाताला फोड आलेले आहेत. त्यांना सामान्य घरातल्या पोरांची जाण आहे कारण त्यांनी ती गरिबी, अपेक्षितांचं जगणं जगलंय.

पण युवा आमदार म्हणून मिरवणारे घराणेशाहीचे वारसदार कधी बोलणार आहेत? कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार
आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार झिशान सिद्दीकी यांचं नेमकं काम काय आहे? कधी तोंड उघडणार आहेत? युवा लोकप्रतिनिधी म्हणून यांची काहीच जबाबदारी नाही का? पण दोष यांचा नाहीच, यांना त्या गरिबीचे चटके कधी बसलेच नाहीत, ना कधी ते भोग नशिबी आलेत. यांचा तर आजोबा, बाप, काका राजकारणात मोठ्या खुर्चीवर होते, यांचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालाय, हे बोलणार तरी कसे!

युवांचे पुरस्कार असतील तर हजर, युवांच्या मुलाखती असतील तर हजर, बोलघेवडेपणा, चमकोपणा करायला पहिल्यांदा हजर मात्र युवांचे प्रश्न मांडायची वेळ येईल तेव्हा मात्र हे पसार असतात.

आज पुन्हा सांगतो, मातीची जाण ठेऊन काम करणारे आणि मातीतल्या माणसांसाठी लढणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रामभाऊ सातपुते हेच आहेत. ज्यांना बापाच्या जीवावर खुर्ची मिळाली ते न्याय देऊ शकत नाहीत, देणार नाहीत हे कटू वास्तव आहे, मान्यच करावं लागेल.

स्वप्नीलला भावपूर्ण श्रद्धांजली... त्याच्या आईची आर्त हाक आतातरी या सरकारच्या कानावर जाईल ही भाबडी अपेक्षा..

- विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
#vikaswaghamare