दिव्यांग वृत्तपत्र विक्रेत्याला तरुण प्राध्यापकाचा आधार! वाचा काय केलीय मदत..

दिव्यांग वृत्तपत्र विक्रेत्याला तरुण प्राध्यापकाचा आधार! वाचा काय केलीय मदत..

सोलापूर : येथील प्रा. विक्रमसिंह बायस यांच्या पुढाकाराने एका अपंग बांधवास वृत्तपत्र विक्रीसाठी व वृत्तपत्र ठेवण्यासाठी नवीन स्टँड ची मदत करण्यात आली.

कन्ना चौक येथे बऱ्याच वर्षापासून तुकाराम पुंडलिक घोडके वय वर्ष ५०  हे वृत्तपत्र विक्री करून आपला चरितार्थ चालवतात. पायांनी अपंग असणारे तुकाराम रोज सकाळी ५ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत वृत्तपत्र विक्री करतात. वृत्तपत्र आणून ते विक्री करेपर्यंत सर्वच घोष्टी ते स्वतः करतात. २००६ च्या वर्षी सावळेश्वर टोल नाका  येथे एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. उपचाराअंती त्यांच्या दोन्ही पायात रॉड टाकण्यात आले, जेणेकरून पुढे जाऊन ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. परंतु असे न होता त्यांच्या पायाचा त्रास तसाच राहीला. कुबड्यांची मदत घेऊन आपला घराचा चरितार्थ चालविण्यासाठी ते सध्या या वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. जमिनीवर प्लास्टिक किंवा कापड टाकून ते वृत्तपत्र विक्री करायचे. नवीन स्टँडमुळे आता वृत्तपत्र विक्रीसाठी व लोकांना दिसेल अश्या पद्धतीने दुहेरी मदत त्यांना होईल व वृत्तपत्र विक्री साठी चालना मिळेल अशी माहिती प्रा विक्रमसिंह बायस यांनी दिली.

अतिशय प्रेरणादायी आयुष्य जगणाऱ्या पैकी एक असे तुकाराम आपल्या घर गृहस्ती चालवण्यासाठी कष्टाने आयुष्य जगत आहेत. कुणाचाही मदतीचा आधार न घेता स्वत:च्या पायावर उभा राहण्याची जिद्द एक वेगळीच प्रेरणा आणि उर्जा देऊन जाते. इतर सर्वांनी त्यांच्या या जिद्दीला व आयुष्य जगण्याच्या वृत्तीला अवलंबले तर नक्कीच आयुष्य जगायचा मार्ग मिळू शकतो. सोलापूरमधील जिद्दीने आयुष्य जगणाऱ्या अपंग बांधवाना अशी व्यवसायभिमुक मदत करत असल्याचे प्रा. बायस यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यासाठी सौ. पद्मावती नागणसूरे, डॉ मोनिका जिंदे, राजेश वडीशेरला यांचे सहकार्य लाभले.