सोलापूरच्या ‘स्नॅप शूटर’चे होतेय कौतुक! कारण..

सोलापूरच्या ‘स्नॅप शूटर’चे होतेय कौतुक! कारण..

Vinay Gote Photography News

सोलापूर : सोलापुरातील युवा छायाचित्रकार विनय महादेव गोटे याचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले आहे.

छायाचित्रकार विनय याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काढलेले सुंदर छायाचित्र विमानतळ प्रशासनाने आपल्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. विमानतळाची तेजस्वी वास्तुकला सर्वांसमोर आणल्याबद्दल कौतुक केले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर विनयने काढलेल्या छायाचित्रला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. 

विनय हा जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक महादेव गोटे यांचा चिरंजीव आहे. तो सध्या वालचंद महाविद्यालयात जीवशास्त्राचे शिक्षण घेत आहे. विनय यास वाईल्डलाईफ फोटोग्राफीची आवड असून त्याने विविध विषयांवर सुंदररित्या फोटोग्राफी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर विनयचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याबद्दल कौतुक होत आहे. विनय हा सोशल मीडीयावर स्नॅप शुटर नावाने आपली छायाचित्रे प्रसिद्ध करतो. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने काय म्हटले आहे?
वाचा - (सोबत विनयने टिपलेले छायाचित्र.)
A reflection on the place where some journeys begin and some end. Thank you Instagrammer '@snap_shooter_' for this fantastic photo, it truly brings out the unique architecture of the airport in the most radiant way possible. 
Keep up the good work.

A reflection on the place where some journeys begin and some end. Thank you Instagrammer '@snap_shooter_' for this...

Posted by CSMIA on Monday, 26 October 2020