वेक अप फाऊंडेशनने वेधले महत्वाच्या विषयांकडे लक्ष; स्मार्ट सिटीच्या सीईओंसोबत चर्चा

वेक अप फाऊंडेशनने वेधले महत्वाच्या विषयांकडे लक्ष; स्मार्ट सिटीच्या सीईओंसोबत चर्चा

सोलापूर : वेक अप फाऊंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या बरोबर सोलापूर येथे सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले.

१) सोलापूर शहराच्या एकुण क्षेत्रफळाच्या फक्त दहा टक्के मध्येच स्मार्ट सिटीचे कामे करण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे व सदर एकुण १० टक्के  /कामे ही २०१६ साला पासून चालू झालेली आहेत, परंतु आत्तापर्यंत या एकुण १० टक्के कामापैकी फक्त १५ टक्केच कामे मागील ४ वर्षात  पूर्ण झालेली आहेत असे त्यांचे म्हणणे आहे, राहिलेली ८५ टक्के कामे अजून अपूर्णच आहेत यावरून मागील चार वर्षांपासून कामात काय गोंधळ   चाललेले आहे ते सर्व सोलापुरकरांना समजेल. परंतु  सदर कामे  पुढील दोन वर्षांत नक्की पुर्ण करु असे आश्वासन नवनिर्वाचित मुख्य अधिकारी यांनी शिष्टमंडळास दिले.

२) सोलापुर येथील सध्या सुरू असलेले स्मार्ट सिटी चे कामांचा दर्जा व गुणवत्ता यांच्याबाबत सुद्धा वेक अप सोलापूर फाउंडेशन यांनी नाराजी बैठकीत व्यक्त केली या सुद्धा माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत दुजोरा   दिला आहे.

३) सध्या पूर्ण झालेल्या ४० कोटी च्या कामाबाबत कन्सल्टन्सी फी म्हणून जवळपास २५ कोटी रुपये संबंधित कन्सल्टान्सी कंपन्यांनी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन सोलापूर यांच्याकडून फी म्हणून वसूल केलेले आहेत हे वेक अप सोलापूर फाऊंडेशनच्या माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट बाब उघड झाली होती ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे हे त्यांनी मान्य केले याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा असे सांगितले.

४)सोलापूर येथे डफरीन चौक येथे जे टेबल टॉप केलेले आहेत अशा प्रकारचे सोलापुरातील महत्त्वाच्या पंचवीस ते तीस ठिकाणी करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले व सर्व तांत्रिक बाबीने  पुर्ण करुणच ती कामे करणार आहोत असे सांगितले.

५)सोलापूर येथे उजनी धरणा वरून एकशे पाच किलोमीटर पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे पाईप आणणण्याची  व्यवस्था गेल्या दोन वर्षापासून झाली नव्हती' ती त्यांनी तातडीने मागील दहा पंधरा दिवसात पूर्ण करून पाईप उपलब्ध करून दिले आहेत व सदर काम सव्वा वर्षांमध्ये पूर्ण करू असे आश्वासन दिले,तसेच उजनी येथे तातडीने Jackwell बांधण्याची गरज आहे यासाठी तातडीने निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी सांगितले, यासाठी आपल्या वेक अप च्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा  त्यामुळे सोलापूर शहरास  दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल असे सांगितले.

६) सोलापूर येथे एनटीपीसीवरून जी पाण्याची पाईपलाईन झालेली आहे सदर पाईपलाईन ही महापालिकेने तातडीने हस्तांतर करून ताब्यात घेतल्यास सोलापूरास २४ तास मागेल तेवढा  पाणी पुरवठा होऊ शकतो असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

७)सोलापूर शहरांमध्ये महिला आणि पुरुष यांच्या प्रसाधनगृहांची व स्वच्छतागृहाची अत्यंत कमतरता आहे यामुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे ही बाब जेव्हा वेक अप सोलापूर फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने त्यांच्या नजरेस आणली यावर सोलापुरातील पन्नास ठिकाणी प्रसाधनगृहाची कुणाचीही अडचण नसलेले जागा अंतिम करून महापालिकेकडे सुपूर्त केले आहेत यासाठी निधी सुद्धा प्राप्त आहे तरी महापालिकेने सदर कामे तातडीने हाती घेण्यात यावी आपणही पाठपुरावा करीत आहात ते करावा असे आश्वासित केले

८)सदर स्मार्ट सिटी चे कामे पुढील दोन वर्षात पूर्ण करायची असल्यास सदर सर्व कामे रात्री सुद्धा करावयाची गरज आहे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना कामे रात्री करण्याची परवानगी मागण्यात आली आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच वेक ऑफ फाउंडेशन सर्वच गोष्टींचा पाठपुरावा करीत आहे त्यांनी' सुद्धा याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले

९)मागील चार वर्षात स्मार्ट सिटी चे कामे एकाच वेळी सर्व ठिकाणी उकरून, नियोजन शुन्य कारभाराने  सगळ्या सोलापूरमध्ये धुळीचे,घाणीचे,अडचणीचे साम्राज्य निर्माण केले गेले आहे व आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे यासाठी त्यांनी आता मात्र एकच कामचे पूर्ण खोदायचे ते काम पूर्ण करायचे मगच दुसऱ्या कामात हात घालायचा यासाठी अशा प्रकारचे नियोजन त्यांनी केले आहे यामुळे कामे व्यवस्थित लवकर पुर्ण होतील असे त्यांनी सांगितले.

१०) सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात जवळपास पाच हजार लाईटचे पोल बसवण्यात येणार आहेत याबाबत कुणाला आपल्या भागात लाईटची व्यवस्था हवी असल्यास त्याने संबंधित स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन मध्ये लेखी स्वरूपात अर्ज द्यावा असे असे सांगितले.

या बैठकीसाठी करोना परिस्थिती असताना सुद्धा वेक अप सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, संचालक माजी नगरसेवक उपेंद्र ठकार, इंजि सुहास भोसले,किसन रिकीबे,प्राचार्य प्रसन्न नाझरे,इक्बाल हुंडेकरी,आंनद पाटील आदी उपस्थित होते. ही बैठक जवळपास एक तास पंधरा मिनिट सुरू होतीm सर्व गोष्टींची संबंधित स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत मनमोकळेपणाने व खरी वास्तविकता स्पष्ट केली. येणाऱ्या काळात तेही सोलापूरचे आहेत आपल्या सोलापूर साठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी नक्कीच करण्यास मला आनंद होईल असे निक्षून त्यांनी शिष्टमंडळास बैठकीत सांगितले.