जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार

जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार

जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार

- जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव 
- भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान

सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. 

जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे।  QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो  मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.

हे आहेत जगातील टॉप 10 टीचर्स 

ग्लोबल टीचर प्राईझ करिता जगभरातून आलेल्या 12 हजारहून अधिक नामांकनातून शेवटच्या फेरीत रणजितसिंह डीसले यांच्यासह 10 जण दाखल झाले.

हे 10 जण वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत. यातील प्रत्येकाने केलेले काम हे नाविन्यपूर्ण आहेच. आपल्यासमोर इतकी मोठी संकटे आहेत म्हणून या टॉप 10 मधील प्रत्येकजण निराश झाला नाही, तर त्यावर मात केली आणि आज ते यशस्वी झाले.

या निमित्ताने मला टॉप 50 आणि आता हे टॉप 10 मधील शिक्षकांशी संवाद साधण्याची, त्यांचे नवनवीन प्रयोग जाणून घेण्याची संधी मिळाली , याचा आनंदच आहे. आता नव्या आव्हानाना सामोरे जात नवीन काहीतरी करण्यासाठी तयार आहे, असे डीसले यांनी सांगितले.