‘आप’चे शतक पार; ग्रामीण भागात दमदार एन्ट्री!

‘आप’चे शतक पार; ग्रामीण भागात दमदार एन्ट्री!

aam aadami party news 

सोलापूर : भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी दिल्लीतील जनतेने साथ दिलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यास केली सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्रदीपक पदार्पण केले. आप ने प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका लढवल्या आहेत. पक्षाच्या जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि १३३ उमेदवार विजयी ठरले आहेत.
 
आपने लातूर,  नागपूर,  सोलापूर,  नाशिक,  गोंदिया,  चंद्रपूर,  पालघर,  हिंगोली, अहमदनगर,  जालना,  यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून आता किती ग्रामपंचायतीवर आपचा  झेंडा फडकणार याची उत्सुकता आहे.
 
ग्रामपंचायती मध्ये विरोधकांनी साम दाम दंड अशी सर्व  हत्यारे वापरली तरीही आप चे सदस्य विजयी झाले हे विशेष आहे. हा अरविंद केजरीवाल यांच्या विकासनीतीचा विजय आहे. जनतेच्या वीज, आरोग्य सुविधा, पाणी, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण अश्या मूलभूत समस्या सोडवत केलेल्या कामाचे आकर्षण शहरी तसेच ग्रामीण जनतेसही आहे ही बाब यातून अधोरेखित होत आहे. शेतकरी नेते आणि उत्तम संघटक अशी ओळख असलेल्या  राज्य पक्ष संयोजक श्री रंगा राचुरेजी यांच्या मार्गदर्शनात या निवडणुका लढवल्या गेल्या.
 
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील यश आप कार्यकर्त्यांचा उच्छाह वाढवणारे आणि सज्जन शक्तीसाठी आशादायक आहे.

तसेच आगामी स्थानीक स्वराज्य संस्था, जिल्हापरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आम आदमी पार्टीकडून तयारी सुरू आहे. शहराच्या व ग्रामीण च्या विविध भागात आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका व जिल्हापरिषद  करण्यासाठी सोलापूरकरांनी आम आदमी पार्टीला साथ द्यावी असे आव्हान आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मो. अस्लम शेख यांनी केले आहे.

गुंजेगाव येथील विजयी सदस्यांसोबत आनंद व्यक्त करताना आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, आतीश गायकवाड, निहाल किरनळ्ळी, भारत अली आदी. आतीश गायकवाड, निहाल किरनळ्ळी, भारत अली छायाचित्रात दिसत आहेत.