शेवंताचे ‘हे’ फोटो पाहून चाहते झाले नाराज!

शेवंताचे ‘हे’ फोटो पाहून चाहते झाले नाराज!

सोलापूर : रात्रीस खेळ चाले.. या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांनी आपल्या फेसबुकवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून शेवंताच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही साडीमध्येच छान दिसतात असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

शेवंताच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा यांच्या फॅन फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर सातत्याने अपूर्वा यांची छायाचित्रे शेअर होतांना दिसत आहेत. रात्रीस खेळ चाले.. या मालिकेत साडीमध्ये दिसणाऱ्या शेवंताला कमी कपड्यांमध्ये पाहून चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कमी कपड्यातील छायाचित्रे पाहून काही चाहत्यांनी निरमा कंपनीच्या जाहिरातीमधील मुलगी आठवली असेही म्हटले आहे.

चाहते म्हणतात..

शरीराचा प्रदर्शन करू नका. तुम्ही साडीतच खूप चांगल्या दिसता.
- समाधान ठाकरे

शरीर उघडं करून कोणीच स्त्री सुंदर दिसत नाही, फक्त मादक दिसते, जरा तरी लाज बाळगा.
- राकेश चव्हाण

अपुर्वा तु शेवंता म्हणुनच लोकांचा मनात फिट बसलेली आहेस. तु खुपच सुंदर आहेस पण रात्रीस खेळ चालेचे तुझे चाहत्यांना मॉडर्न अपुर्वा ' परी ' सारखी असली तरी त्या चाहत्यांना खटकते... तु खुपच गुणी लावण्यवती अभिनेत्री आहेस.
- स्वप्नील मोरे

तुम्हाला हे शोभत नाही, साडीतच छान दिसता राव.... असं का करता येड्यासारखं.
- धोंडीराम अर्जुन

मॅडम तुम्ही साडीमध्येच शोभून दिसता. हे योग्य नाही, तुम्हाला लोकांनी साडीवर पसंती दिलीय, अंग भरून कपडे कधीही चांगले.
- प्रशांत कटारे

तुम्ही फार म्हणजे फार सुंदर आहात.. पण तुम्ही एक मराठी स्री आहात. आम्हाला तुम्ही साध्या वेशात छान छान दिसतात. तुमच्याबद्दल कोणी गलिच्छ शब्द बोलले आम्हाला आवडणार नाही. तुम्ही तुमचे असे फोटो शेअर करू नका.
- विशाल गुजर

अपूर्वा मॅडम तुम्हालाही नाव खराब करून घ्यायचंय का...? तुम्ही साडीत आणि फुल ड्रेसमधेच छान दिसता. लोकांनी तुम्हाला साडीत पसंती दाखवली आहे. आता नको त्या फंदात पडू नका.. शेवंतांची भूमिका तुम्ही अप्रतिम केली. त्याला तोडच नाही. तुम्ही acting खूप छान करता.. तुमचं सौंदर्य मनाला भुरळ पाडतं म्हणून कसेही फोटो काढून सोशल मीडियावर टाकू नका... आज जे लोक वाहवा करतात तेच लोक जरा काय झालं की शी- थू करतील. त्यापेक्षा व्यवस्थित रहा. छान छान फोटो काढा... आणि असेच फोटो काढायचे असतील आणि काम मिळवायची असतील तर ती फिल्म इंडिस्ट्री पुरते मर्यादित ठेवा. खूप वाईट वाटलं तुमच्या असल्या पोस्ट पाहून.. म्हणून कळकळीची विनंती काढा तुम्ही फोटो, तुम्हाला आवड असेल किंवा काम मिळवायची असतील. पण फोटो सोशल मीडियावर नका टाकू प्लीज.
- निकिता रेडकर

मॅडम साडी जास्त छान वाटते तुम्हाला. स्त्री कोणती ही असो..
सिरीयलमध्ये काम करणारी असो किंव्हा घरातली हाऊस वाईफ असो. अंगभर कपड्यातच ती छान दिसते. बाकी तुमची इच्छा.
- सारिका खतडे

अपूर्वा साडी मधल्या फोटोमध्ये एवढी ताकद होती की तू overnight लोकांच्या "दिल की धडकन" झालीस.
आणि हा फ्रॉक मधला फोटो नाही भावला मनाला. काळजी घे.
- डॉ. नीलिमा वैद्य

अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो खालील प्रमाणे..