ड्रेनेज चेंबरमध्ये पडून परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

ड्रेनेज चेंबरमध्ये पडून परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

akkalkot road drainage line accident

सोलापूर : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील सादूल पेट्रोल पंपाजवळ घडली. या परिसरात मुद्रा सनसिटी या प्रकल्पाच्या ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे.

बैचन परभू ऋषीदेव (वय 36, रा. बिहार), आशिषकुमार भारतसिंग राजपुत (वय 17, रा. उत्तर प्रदेश) अशी दोघा मृतांची नावे आहेत. आणखी एका मृताचे नाव समजले नाही. आज गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सादूल पेट्रोल पंपासमोर ड्रेनेज लाईनचे काम करत असताना ड्रेनेज लाईनमधील पाण्यात पडून दोघे बेशुध्द झाले. त्यांना बाहेर काढण्यात आले. तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीसात झाली आहे.

विडिओ -